esakal | दुर्दैवी घटना: व्याहीच्या अंत्यविधीहून परतणाऱ्या विहिणीचा अपघातात मृत्यू 

बोलून बातमी शोधा

दुर्दैवी घटना: व्याहीच्या अंत्यविधीहून परतणाऱ्या विहिणीचा अपघातात मृत्यू 

तळोदा बायपास मृत्यच्या सापळा झाला असून याठिकाणी आता तरी वाहतुकदारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवशयक आहे..

दुर्दैवी घटना: व्याहीच्या अंत्यविधीहून परतणाऱ्या विहिणीचा अपघातात मृत्यू 
sakal_logo
By
सम्राट महाजन

 तळोदा : व्याहीच्या अंत्यविधीहून गावी परणाऱ्या विहिणीच्या दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात विहिणीच्या दुर्दैवी मृत्यूची घटना बुधवारी (ता.२४) दुपारी तळोदा बायपासवर घडली. अज्ञात ट्रक अंगावरुन गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. 

आवर्जून वाचा- चाळीसगावात कोरोना एक्सप्रेस सुसाट; चार हजारांवर रुग्ण 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मधुकर गोपाळ पटेल (वय ६१, रा. अमोदा ता. कुकरमुंडा जि. तापी) व त्यांच्या पत्नी सखूबाई पटेल (वय ५५) हे त्यांचे व्याही बबन त्र्यंबक पटेल (रा. धानोरा, ता. तळोदा) यांचा अंत्यविधी करून दुचाकी (क्रमांक जीजे १९ एपी ५४८२) ने गावी परतत होते. दुपारी १२ च्या सुमारास त्यांची दुचाकी तळोदा बायपासवरील बालाजी पेट्रोल पंपजवळ आली असता मागून भरधाव येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांचा दुचाकीला धडक दिली. यामुळे सखूबाई व त्यांचे पती मधुकर पटेल खाली पडले. सखुबाईच्या अंगावरुन ट्रकचे मागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलीस निरीक्षक नंदराज पाटील, उपनिरीक्षक अभय मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी घटनास्थळी बघ्याची एकच गर्दी झाली होती. तळोदा पोलीस ठाण्यात मधुकर पटेल यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. 

आवश्य वाचा- जामनेरमध्ये कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर ‘गुलाबी गँग’महिला पथकाची धडक मोहीम 

बघ्याची असंवेदनशीलता 
अपघातानंतर त्याठिकाणी बघ्यांनी एकच गर्दी केली होती, कोरोना प्रादुर्भावाचा विसर पडलेल्या बघ्यांनी अपघाताचे छायाचित्रण करण्यातच धन्यता मानत असंवेदनशीलतेचे दर्शन घडविले. तर सामाजिक कार्यकर्ते जगदीश परदेशी, चेतन शर्मा व वाहतूक पोलीसांनी जमलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले. 
 

हेही वाचा- खानदेशच्या सुपुत्राचा गुजरात मध्ये डंका ! दुसऱ्यांदा नगरसेवक पदी विजयी
 

बायपास बनला मृत्यच्या सापळा 
तळोदा बायपासवरील कॉलेज चौफुली ते फॉरेस्ट चेक नाक्यापर्यंत याआधीही अनेक अपघात होत असंख्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. २० दिवसांपूर्वी हॉटेल सदभावना जवळच्या अपघातात एकाला जीव गमवावा लागला तर काही दिवसांपूर्वी याच बायपासवर एक टॅंकर उलटले होते. सुदैवाने त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. आज मात्र एका निरपराध महिलेला अपघातात जीव गमवावा लागला. यामुळे तळोदा बायपास मृत्यच्या सापळा झाला असून याठिकाणी आता तरी वाहतुकदारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे