मोटारसायकलला धडक बसल्याने मायलेकांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

सोमवारी पहाटे येवल्याजवळ मनमाड महामार्गावर हॉटेल जीवनधारासमोर पहाटेच्या वेळी एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने गोरखनगर येथील रंजना बाळू मेमाणे (वय 40) व मुलगा गोकुळ बाळू मेमाणे (वय 20) या मायलेकांचा मृत्यू झाला आहे.

येवला - वाईट वेळ चालून आली की नियतीपुढे कुणाचे काही चालत नाही.असाच प्रत्यय सोमवारी पहाटे जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून परतत असतांना गोरखनगर येथील मायलेकांवर आला आहे.

सोमवारी पहाटे येवल्याजवळ मनमाड महामार्गावर हॉटेल जीवनधारासमोर पहाटेच्या वेळी एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने गोरखनगर येथील रंजना बाळू मेमाणे (वय 40) व मुलगा गोकुळ बाळू मेमाणे (वय 20) या मायलेकांचा मृत्यू झाला आहे. मायलेकांचा मृत्यू झाल्याने गोरखनगर गावावर शोककळा पसरली आहे. गोकुळ आपल्या आईला घेऊन रविवारी शिर्डी येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते.

घरी म्हशी असल्याने सकाळी डेअरीला सात वाजेच्या आत दूध घालण्यासाठी घरी पोहोचण्यासाठी ते आज पहाटेच्या सुमारास शिर्डीहुन निघाले होते. परतत असताना पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास येवल्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने आईचा जागेवरच मृत्यू झाला. तर मुलाला नाशिक येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर मृत्यू झाला. आईचा मृतदेह येवला येथील शासकीय रुग्णालयात आणला असून मृतदेहाचे पोस्टमार्टेम करण्यात येणार आहे तर मुलाच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम नाशिक येथे करण्यात येणार आहे. गोकुळ हा घरातील एकुलता एक असल्याने प्रपंचाचा सर्व भार त्याच्यावरच होता एकाच दिवशी मायलेकांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Accident of Motorcycle and Truck Two Died