नाशिकजवळ अपघातात तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

या अपघातात अंकित चौधरी व अन्य एक जण जखमी झाले असून, त्यांनी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

नाशिक - नाशिक-कल्याण महामार्गावर आज (सोमवार) पहाटे इनोव्हा कारने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोघे जण जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकजवळील वाडीवऱ्हे गावाजवळ आज पहाटे हा अपघात झाला. अंकित चौधरी (वय 8) आणि त्याची बहिण मानसी चौधरी (वय 13) हे दोघे कल्याणहून सटाणा तालुक्यातील नामपूर येथे दिवाळी सुट्टीनिमित्त काका मुकेश चौधरी यांच्याकडे आले होते. आज पहाटेच्या सुमारास इनोव्हा कारने कल्याणकडे परतत असताना, वाडीवऱ्हे येथे शिवारात उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिली. या अपघातात भाऊसाहेब आनंद गांगुर्डे (वय 45, नाशिक), मानसी चौधरी आणि मुकेश चौधरी हे तिघेजण जागीच ठार झाले.

या अपघातात अंकित चौधरी व अन्य एक जण जखमी झाले असून, त्यांनी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: accident on nashik-kalyan highway, 3 dead