पाचोरा तालुक्यात भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास भैरवनाथ यात्रेला जात असताना हा अपघात झाला. एका मृताचे नाव रतन शिवलाल बारी (रा. शेंदुर्णी वय ५०) असे आहे.

जळगाव - जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे आज (रविवार) सकाळी आयशर टेम्पो उलटून झालेल्या भीषण अपघातात चौघांची मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे 20 पेक्षा अधिक जणांना घेऊन जाणारा आयशर टेम्पो पलटी झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर 10 हून अधिक जण जखमी आहेत. काही जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास भैरवनाथ यात्रेला जात असताना हा अपघात झाला. एका मृताचे नाव रतन शिवलाल बारी (रा. शेंदुर्णी वय ५०) असे आहे.

Web Title: accident near pachora 4 dead

टॅग्स