चाळीसगाव-पिलखोडजवळ अपघातात एक ठार, तर एक जखमी 

दीपक कच्छवा
मंगळवार, 5 जून 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) : पातोंडा (ता.चाळीसगाव) येथे चाळीसगाव - मालेगाव रस्त्यावर पिलखोडजवळ दुचाकी व ट्रकची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना आज (ता. 5) दुपारी साडेबाराला घडली.

चाळीसगाव येथून मालेगावकडे दुचाकीवरून जात असताना पातोडा येथील अरून माळी व ज्ञानेश्वर माळी यांच्या  दुचाकीची व ट्रकची समोरासमोर धडक  झाली. यात अरूण माळी यांचा जागेवर मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर माळी गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी मेहुणबारे पोलिस दाखल झाले असुन पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: accident at pilkhod 1 died 1 injured