PHOTOS : दाट धुक्यामुळे बसचालकाला खड्डे दिसलेच नाही..आणि मग..

अमोल खरे : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

गेली काही वर्षे नाशिककरांना ही समस्या भेडसावते आहे. विशेषत: महामार्गावर पडणारे खड्डे धोकादायक असून या खड्डयांमधून वाहनचालकांना कसरत करतच जावे लागले. खड्डा चुकवत, अपघात टाळत त्यांना वाहन चालवावे लागते. मात्र, सगळेच जण सुदैवी नसतात. रस्त्यांवरील अनेक जुने खड्डे तसेच असताना पाऊस सुरू होताच रस्त्यांची अगदी चाळण होऊन जाते.

नाशिक : पुणे- अक्कलकुवा बसला मनमाड जवळच्या अनकवाडे शिवारात अपघात झाल्याची घटना घडलीय .इंदूर - पुणे महामार्गाची  दुरावस्था झाली असून दाट धुक्यामुळे खड्डे चुकवितांना चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कलंडून  हा अपघात झाला. यावेळी बसमध्ये  ४० प्रवासी होते त्यापैकी १८ ते २० प्रवासी  किरकोळ जखमी झाले. बस उलटल्यावर प्रवाशांनी आरडाओरडा केल्यामुळे अनेकवाड़े गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढले व जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवाशांना किरकोळ झाली दुखापत.सुदैवाने जीवित हानी झाली नाही. नगर-मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्ड्यामुळे रोज अपघात होत आहेत .

Image may contain: sky and outdoor

मनमाडच्या अनेकवाडे शिवारातील घटना, १८ ते २० प्रवाशी किरकोळ जखमी 

गेली काही वर्षे नाशिककरांना ही समस्या भेडसावते आहे. विशेषत: महामार्गावर पडणारे खड्डे धोकादायक असून या खड्डयांमधून वाहनचालकांना कसरत करतच जावे लागले. खड्डा चुकवत, अपघात टाळत त्यांना वाहन चालवावे लागते. मात्र, सगळेच जण सुदैवी नसतात. रस्त्यांवरील अनेक जुने खड्डे तसेच असताना पाऊस सुरू होताच रस्त्यांची अगदी चाळण होऊन जाते.

Image may contain: tree, sky and outdoor

खड्डयांमुळे अनेक जण गंभीर जखमी

पावसाला प्रारंभ झाल्यानंतर आठवडाभरातच रस्ते खड्डेमय होऊन जातात. रस्त्यांत नुसते खड्डेच पडतात असे नव्हे तर खड्डयांमध्ये पाणी साचते. परिणामी हे खड्डे वाहनचालकाच्या लक्षात येत नाहीत आणि हे वाहन त्या खड्डयात अडकण्याची किंवा त्या खड्डयांमुळे उलटण्याचीही भीती असते. दुचाकी वाहनचालकाला तर या खड्डयांचा धोका अधिक असतो. या खड्डयांमुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्यांवरील व महामार्गावरील खड्डे पार करताना वाहनचालकांना अनेक तास कसरत करावी लागते तसेच या खड्ड्यातून जाताना वाहनचालकांची हाडे खिळखिळी होऊन जातात व कित्येक वाहनचालकांना पाठदुखी, मणक्याचे आजार किंवा खांद्याचे आजार होतात आणि त्यांना आयुष्यभर वैद्यकीय उपचार घेत बसावे लागते. या खड्डयांच्या न संपणा-या मालिकेमुळे वाहनेही खिळखिळी व नादुरुस्त होत असतात. त्यामुळे वाहनमालकांचा खर्च वाढत असतो. खड्डयांमुळे वाहतूककोंडी होऊन लोकांचे कित्येक तास फुकट जातात हे वेगळेच.

Image may contain: sky, tree, plant and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident of Pune-Akkalkuwa bus accident at Nashik