सटाणा-नामपूर रस्यावर भीषण अपघात, 1 ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

सटाणा : सटाणा - नामपूर रस्त्यावर दोधेश्वर फाट्याजवळ काल सोमवारी (ता.२३) दुपारी ऑल्टो कार व पिकअप या दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात साक्षी संजय शेवाळे (वय १७, रा.चौगाव, ता. बागलाण) या युवतीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर जखमींना नाशिक येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सटाणा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सटाणा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सटाणा शहरातील सुभाष रोड क्रमांक ३ मध्ये वास्तव्यास असलेले गोविंद नानाजी देवरे हे काल सकाळी पत्नी योगिता गोविंद देवरे, मुलगी आरुषी गोविंद देवरे, मुलगा आरुष गोविंद देवरे व आपली नातलग साक्षी संजय शेवाळे (वय १७, रा.चौगाव, ता. बागलाण) हिला सोबत घेऊन खिरमाणी (ता.बागलाण) येथे गेले एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त गेले होते. दुपारी कार्यक्रम आटोपून देवरे कुटुंबीय साक्षीसह अल्टो कारने सटाण्याकडे परतत होते.

दोधेश्वर फाट्याजवळील अवघड वळणावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने देवरे यांच्या अल्टो कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात साक्षी शेवाळे हिचा जागीच मृत्यू झाला. तर गोविंद देवरे, योगिता देवरे हे पती - पत्नी व त्यांची दोन मुले आरुषी व आरुष हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी जखमींना तात्काळ सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तज्ञांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले.

Web Title: accident on satana nampur road 1 dies