नाशिकचा जवान सागर चौधरीचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

श्रीनगरला झालेल्या अपघातात सागर माधव चौधरी (वय.२७) रा. भरवस वाहेगाव ता.निफाड यांचा अपघाती मृत्यू झाला. (ता.२३) सप्टेंबरला सागर हे जम्मू येथे -56-R सेक्टर मध्ये कार्यरत होते.

नाशिक : श्रीनगरला झालेल्या अपघातात सागर माधव चौधरी (वय.२७) रा. भरवस वाहेगाव ता.निफाड यांचा अपघाती मृत्यू झाला. (ता.२३) सप्टेंबरला सागर हे जम्मू येथे -56-R सेक्टर मध्ये कार्यरत होते. सागर चौधरी हे कुटुंबाचा एकमेव आधार होते. २३ मार्च २०१२ ला ते लष्करात दाखल झाले.  त्यांच्यामागे त्यांची पत्नी, एक वर्षाचा मुलगा व दोन विवाहित बहिणी आहे.

दोन दिवसांपूर्वी त्यांच्या जम्मू येथील मित्राने सागर चौधरी बद्दल घरी माहिती कळवली. मात्र शासकीय स्तरावर त्यांच्या मृत्यूबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती. तब्बल दोन दिवसानंतर अधिकृत माहिती मिळाली. गुरुवारी (ता.२६) सप्टेंबरला सकाळी पावणे आठला त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव  विमानाने मुंबईत व तेथून नाशिकला त्यांच्या भरवस (ता निफाड) या गावी आणण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidental death of Jawan Sagar Chowdhury of Nashik