करंजाडजवळ शिवशाही बस व गॅस टँकरचा भीषण अपघात 

दीपक खैरनार  
रविवार, 15 जुलै 2018

अंबासन : करंजाड (ता.बागलाण) जवळ जाणा-या विंचूर प्रकाशा महामार्गावर आज रविवार (ता.१५) सकाळी साडेदहा वाजता नाशिकहून भरधाव वेगाने येणा-या शिवशाही आणि ताहाराबादकडून सटाण्याच्या दिशेने येणाऱ्या ज्वलनशिल केमिकल वाहतुक करणा-या ट्रेलरचा भीषण अपघात झाला. अपघातात पंधरा ते वीस प्रवाशी जखमी झाले असून त्यांना सटाणा व मालेगाव येथील शासकीय रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. 

आज सकाळी नाशिकहून सटाणामार्गे ताहराबादकडे शिवशाही बस ( एमएच् ०६ बीडब्ल्यू 0769) भरधाव वेगात येत होती. याच वेळी ताहाराबादहून नाशिककडे ज्वलनशिल केमिकल वाहतुक करणारा ट्रेलर (युपी 70 एफटी 0667) हा देखील भरधाव वेगाने जात होता. करंजाडजवळ सकाळी साडेदहा वाजता या दोन्ही वाहनांनी एकमेकांना जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या अपघातात बसमधील प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. १५ ते २० प्रवाशांच्या हात, पाय, डोक्याला, मानेला दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले.

अपघातामुळे ट्रेलर महामार्गाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटला आहे. तसेच शिवशाही बसचा समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची वार्ता पसरताच अनेकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघातात जखमी झालेल्या बसमधील पंधरा ते वीस प्रवाशांना तात्काळ सटाणा व मालेगाव येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जायखेडा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते त्वरित घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. महामार्गावर दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनाच्या रांगाचा रांगा लागल्या आहेत.

ट्रेलर एलपीजी गॅसने भरलेला असून गॅस लिक होऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. नाशिकहून पथक पाचारण करण्यात आले असल्याची माहीती पोलिसांनी दिली. वाहतूक व गर्दी पोलिसांकडून हटविण्यात आली आहेसटाणा तालुक्यातील ताहाराबाद हा रस्ता अतिशय रूंदी व वळणाचा असूनही वाहनचालक भरधाव वेगाने वाहन चालवित असल्याचे दिसून येते आहे. गेल्या महिनाभरात या महामार्गावर शिवशाही बसचा हा तिसरा अपघात झाला आहे. दरम्यान, सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून शासनाने महामार्गाचे चौपदरीकरण करावे आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सटाणा शहर वळण रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.

Web Title: accidents of Shivshahi bus and gas tank near Karanjh