बोगस पट दाखविणाऱ्या 1404 शाळांवर कारवाई 

बोगस पट दाखविणाऱ्या 1404 शाळांवर कारवाई 

साक्री, (जि. धुळे)  - राज्यात 2011 मध्ये राबविण्यात आलेल्या पटपडताळणीमध्ये बोगस आकडेवारी दाखविणाऱ्या राज्यातील 1404 शाळांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. या पटपडताळणीत दीड लाख विद्यार्थिसंख्या बोगस दाखविण्यात आलेली असून, संबंधित मुख्याध्यापकांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. 

शिक्षण विभागाने 3 ते 5 ऑक्‍टोबर 2011 दरम्यान सर्व शाळांमध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविली होती. त्यात अनेक संस्थांनी गैरप्रकार केल्याची चर्चा सुरू होती. अनेक दिवस थंड बस्त्यात गेलेल्या या विषयाला गती देत शिक्षण विभागाने नुकतेच सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश काढले असून, कारवाईची सूचना केली आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक सुनील चव्हाण यांनी हे आदेश काढल्याचे समजते. 

पटपडताळणी मोहिमेत बोगस विद्यार्थी आढळलेल्या शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशात म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार संचालकांनी कारवाईचे परिपत्रक काढले असून, यामुळे बोगसगिरी करणारे अनेक संस्थाचालक, मुख्याध्यापक कारवाईच्या कचाट्यात सापडणार आहेत. 

शाळांनी दीड लाख विद्यार्थ्यांची बोगस संख्या दाखविल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली होती. या बोगस संख्येच्या आधारे वाढीव तुकड्या मंजूर करणे, अतिरिक्त शिक्षकांची पदे भरणे, त्याचबरोबर शालेय पोषण आहार, गणवेश, लेखनसाहित्य, मोफत पाठ्यपुस्तके, स्वाध्याय पुस्तिका, उपस्थिती भत्ता, टर्म फी, शिष्यवृत्ती आदी लाभ गैरमार्गाने मिळविल्याने शासनाचे मोठे नुकसान झाले आहे. 

जिल्हानिहाय शाळा अशा 
ठाणे - 75 
रायगड - 110 
कोल्हापूर - 5 
सांगली - 7 
सातारा - 11 
रत्नागिरी - 7 
सिंधुदुर्ग - 9 
लातूर - 72 
नांदेड - 178 
उस्मानाबाद - 15 
औरंगाबाद - 56 
बीड - 39 
हिंगोली - 6 
जालना- 31 
परभणी - 58 
सोलापूर - 115 
नंदुरबार - 49 
धुळे - 35 
जळगाव - 49 
नाशिक - 34 
बुलडाणा - 16 
यवतमाळ - 24 
भंडारा - 13 
गोंदिया - 13 
वर्धा - 09 
नगर - 13 
चंद्रपूर - 43 
पुणे - 33 
वाशीम - 12 
अमरावती - 23 
अकोला - 22 
मुंबई - 53 
नागपूर - 128 
गडचिरोली - 38 
पालघर - 03 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com