बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

जळगाव - शहर वाहतूक शाखा- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या पथकाने बुधवारी शहरात संयुक्त मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 46 रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

जळगाव - शहर वाहतूक शाखा- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या पथकाने बुधवारी शहरात संयुक्त मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 46 रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

शहरातील अजिंठा चौक, इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, बसस्थानक परिसर, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, पांडे डेअरी चौक, नेरी नाका चौक यांसह शहरातील विविध गर्दीची ठिकाणे आणि रहदारीच्या परिसरात बेशिस्त आढळून आलेल्या रिक्षाचालकांवर शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक प्रदीप देशमुखांसह कर्मचारी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहायक मोटारवाहन निरीक्षक अजय चौधरी, राहुल जाधव यांच्या पथकाने 46 रिक्षांवर संयुक्त कारवाई केली. त्यात वाहन चालविण्याचा परवाना नसणे, गणवेश नसणे, कागदपत्रे नसणे, विना नंबरप्लेट रिक्षा चालविणे, मीटर नसणे अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केली. त्यात दोन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला. संध्याकाळपर्यंत ही संख्या वाढण्याची शक्‍यता श्री देशमुख यांनी व्यक्त केली.

Web Title: action on Indiscipline rickshaw driver