डीजे वाजविल्यास होणार कारवाई

Action will be taken while playing the DJ
Action will be taken while playing the DJ

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : अगामी येणाऱ्या गणेशोत्सव काळात मेहुणबारे पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमधील गणेश मंडळांची नुकतीच बैठक घेण्यात आली. उत्सव काळात गणेश मंडळांनी डीजे वाजविल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा मेहुणबारे पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिली.

मेहुणबारे पोलिस ठाण्याअंतर्गत 55 गावे आहेत. येणाऱ्या
 गणेशोत्सव काळात मंडळानी काय खबरदारी बाळगावी यासाठी नुकतीच पोलिस ठाण्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीला परिसरातील सर्व गणेश मंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना बोलविण्यात आले होते. मेहुणबारे पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी मंडळांच्या पदाधिकारी यांना सुचना दिल्या, उत्सव काळात कुणीही डीजे लावु नये, आपल्या जुन्या पारंपरिक वाद्यांना पसंती द्यावी, तसेच या काळात कुणी डीजे लावल्यास त्याच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल असा देखील इशारा हिरे यांनी दिला. मेहुणबारे पोलिस हद्दीत सार्वजनिक गणेश मंडळ 35, खाजगी 1 एक गाव एक गणपती 8 अशी मंडळे असुन या सर्वाना यावेळी सुचना देण्यात आल्या. या बैठकीला सरपंच संघमित्रा चव्हाण, उपसरपंच रूषीकेश अमृतकर, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

डीजे लावला तर होणार कारवाई 

भा.द.वि.स. 188, 290, 291, 34, सह महाराष्ट्र पो.का.क. 131, 134, 135, 140 व पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 15 सह ध्वनिप्रदूषण नियम 2000 चे नियम क्र. 3 (1), 4(1), 5 (4) प्रमाणे गुन्हे दाखल केले जातील. चारित्र्य दाखला देताना याचा उल्लेख दाखल्यात केला जातो. त्यामुळे आपल्याला नोकरी, पासपोर्टसह इतर ठिकाणी त्याचा फटका बसतो. व सर्व मंडळाच्या पदाधिकारी ह्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. यासाठी मंडळाने कारवाई टाळायची असेल तर डीजे लावु नये असे आव्हान मेहुणबारे पोलिसांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com