शेतकऱ्याचा मुलगा बनला अभिनेता 

सुधाकर  पाटील
शनिवार, 21 जुलै 2018

भडगाव : राजकारण्याचा मुलगा राजकारणात येतो, अभिनेत्याची मुले ही सहज अभिनय क्षेत्रात येतात. त्यामुळे नव्याना या क्षेत्रात एंट्री करणे अवघड असते. मात्र भडगाव तालुक्यातील बोदर्डे येथील शेतकऱ्याच्या मुलाने कोणतीही पार्श्वभूमी नसतांना काल प्रदर्शित झालेल्या  'रे राया कर धावा' मराठी चित्रपटात प्रमुख भुमिका साकारत मायानगरीत प्रवेश मिळवला आहे. त्याचे सुदर्शन रमेश पाटील असे नाव आहे. 

भडगाव : राजकारण्याचा मुलगा राजकारणात येतो, अभिनेत्याची मुले ही सहज अभिनय क्षेत्रात येतात. त्यामुळे नव्याना या क्षेत्रात एंट्री करणे अवघड असते. मात्र भडगाव तालुक्यातील बोदर्डे येथील शेतकऱ्याच्या मुलाने कोणतीही पार्श्वभूमी नसतांना काल प्रदर्शित झालेल्या  'रे राया कर धावा' मराठी चित्रपटात प्रमुख भुमिका साकारत मायानगरीत प्रवेश मिळवला आहे. त्याचे सुदर्शन रमेश पाटील असे नाव आहे. 

अनेकजण चित्रपटात अभिनय करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची करत असतात. तरीही त्यांना त्यात संधी मिळत नाही. मात्र ज्याच्यात गुणवत्ता आहे ते कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही आपले आवडीचा क्षेत्र काबीज करू शकतात हे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ग्रामिण भागातील कलाकारांना आपल्या चित्रपट अभिनयाची संधी देऊन सिध्द केले आहे. बोदर्डे येथील सुदर्शन पाटील याचे नशिब अशाच पद्धतिने फडफडले. आणि त्याला चक्क 'रे राया कर धावा' या मराठी चित्रपटात प्रमुख भुमिका साकरण्याची संधी मिळाली. 

सुदर्शन हा राष्ट्रीयस्तरावरील खेळाडू

सुदर्शन रमेश पाटील हा पाचवी पासुन शिर्डी जवळ आत्ममलिक इंटरनॅशनल स्कुल मधे शिकायला आहे. तेथे त्याला सुरवातीपासुन खेळात आवड होती. त्याने अॅथलिटीक्स मधे सराव सुरू केला. तो 8 वीत उंचउडीत राज्य स्तरावर खेळला. तर नववित राष्ट्रीयस्तरापर्यंत त्याने मजल मारली. त्याला शाळेने प्रोत्साहन दिले तर प्रशिक्षक अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांने विविध स्पर्धा गाजविल्या. ऑलम्पिक मधे भारताकडुन खेळण्याचे ध्येय बाळगलेल्या सुदर्शनला चित्रपटाच्या माध्यमाने अचानक रूपेरी पडद्यावर झळकण्याची संधी चालुन आली. 

...आणि संधी मिळाली 
सुदर्शन पाटील यांचे स्पर्धेतील व प्रॅक्टीसचे व्हीडीओ त्याचे प्रशिक्षक अजित पवार यांनी युट्युबवर अपलोड केले होते. हे व्हीडीओ चित्रपटाचे लेखक कीरण बेरड यांनी पाहीले. हे व्हीडीओ दिग्दर्शक मिलिंद शिंदे व निर्माता संजय पोपटानी यांना दाखविले. त्यांनी तत्काळ प्रशिक्षक अजित पवार यांची भेट घेतली. आणि सुदर्शन पाटीलला चित्रपटात काम करण्याचा आग्रह धरला. सुदर्शनने ही संधीचे सोने करत होकार दिला. तो त्यावेळी दहावीचे पेपर देत होता. 2016 मधे त्याला पुण्यात प्रोड्युशन टीम मधे दिड महीने पाठविण्यात आले. पुर्वी अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसतांना त्या कालावधीत त्याने अभिनयासाठी स्वतःला सिध्द केले. या चित्रपटात एक प्रशिक्षक दुर्गम भागात राहणाऱ्या तिन मुलांना प्रतिकुल परीस्थिती खेळात यशस्वी करतो. त्यात एका आकाश नामक खेळाडूची प्रेरणादायी भुमिका सुदर्शन साकारत आहे. 

सुदर्शन एका शेतकऱ्य़ाचा मुलगा

सुदर्शन पाटील हा बोदर्डे ( ता.भडगाव) रमेश पाटील यांचा मुलगा आहे. पाटील हे शेती कसतात. त्यांच्याकडे 8 बीघे जमिन आहे. सुदर्शन ला एक मोठी बहीण आहे. तर एक लहान भाऊ आहे. मुलाच्या या कामगिरीवर वडील रमेश पाटील खुप खुश आहे. तर गावकरी ही आपल्या गावाचा मुलगा 'हीरो' झाल्याचा अभिमाने सांगत आहे. तालुक्यात विशेषतः तरूणाईला त्याच्या चित्रपटाची खुप उच्छुकता आहे. 

माझे खेळातच करीअरचे ध्येय आहे. मात्र चित्रपटात पुन्हा चांगली संधी मिळाली तर निश्चित काम करू. प्रयत्न व गुणवत्ता सिध्द केली तर संधी नक्की मिळते. त्यासाठी वशील्याची वा पार्श्वभूमीची आवश्यकता नाही. 

- सुदर्शन रमेश पाटील नवोदित अभिनेता

Web Title: Actor becomes son of farmer