आदित्य सरांच्या शिकवणीत हरखल्या नांदगावच्या विद्यार्थिनी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

नांदगाव -  शत्रूचा हल्ला परतवून टाकतांना बचावतमक पवित्रा कुठला घ्यायचा, एकटे दुकटे असल्यास किमान हातातल्या किल्लीचा प्रसंगानुरूप वापर कसा करावा, आत्मरक्षणचे असे धडे चक्क युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे देताहेत. हे बघून या प्रशिक्षणासाठी आलेल्या मुली काही काळ हरखून गेल्या. आदित्यसरांची अशी शिकवणी बघून मग उपस्थितीत मुलींना राहवले नाही. त्यांच्याकडे जाण्यासाठी एकच गलका झाला. आणि नांदगाव दौरयावर आलेले आदित्य ठाकरे देखील प्रशिक्षण देण्यात रममाण झाले.

शिवसेनेचे जिल्ह्प्रमुख सुहास कांदे यांनी गुप्ता लॉन्समधील सेल्फ डिफेन्स ट्रेनींगला आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. या शिबिरात तालुक्याच्या विविध शाळा महाविद्यालयांच्या जवळपास दीड हजाराहून अधिक मुलींनी सहभाग घेतला. ठाकरे येण्यापूर्वी मुबईचे मेहून अरोरा, नाशिकच्या राहुल देशपांडे, स्नेहा कोल्हे-पाटील या कराटे प्रशिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींना व्यासपीठावर बोलावून घेत विविध प्रात्यक्षिके करवून घेतली. मालेगावहून नांदगावला आगमन झालेल्या आदित्य ठाकरे यांचे थेट प्रशिक्षणातच झाले. हातात माईक घेतलेले आदित्य ठाकरे यांनी सध्या एकट्या दुकट्या मुलींवर होत असलेले हल्ले रोखायचे कसे यावर थेट सवांद साधला.

कसलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता सुरु झालेला हा सवांद नंतर अर्धा तासाहून अधिक काळ चालला. मुलगी शाळकरी असो की महाविद्यालयीन तिला भेडसाविणाऱ्या दैनंदिन समस्यांशी तिनेच दोन हात करीत मुकाबला कसा करावा ज्यातून तिच्यात धैर्य निर्माण होईल असा उद्देश ठेवून आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सध्या राज्यभरात मोफत सेल्फ डिफेन्स ट्रेनींग कॅम्पस सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून नांदगावला आदित्य ठाकरे यांचा दौरा संपन्न झाला. तुम्हाला रणरागिणी व्हायचं असेल तर स्वतःच स्वसंरक्षणार्थ आत्मरक्षणाचा मार्ग स्वीकारावा लागेल. असा सल्ला देतांना आदित्य ठाकरे यांनी उपस्थित मुलीकडून काही प्रात्यक्षिके करवून घेतले.  आत्मरक्षणाचा मौलिक सल्ला मिळालेल्या मुलींनी मग सेल्फी काढण्यासाठी केली.

Web Title: aditya thackeray at nandgaon's students self defense camp