विधानसभेत शिवसेनेची ‘बोहणी’ चांगली होणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

शिवसेनेच्या युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे हे जळगावातून जनआशीर्वाद यात्रेची सुरवात करीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची राजकीय ‘बोहणी’ चांगली होईल, असा विश्‍वास सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

जळगाव - शिवसेनेच्या युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे हे जळगावातून जनआशीर्वाद यात्रेची सुरवात करीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात शिवसेनेची राजकीय ‘बोहणी’ चांगली होईल, असा विश्‍वास सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या जळगाव दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर केमिस्ट भवनात काल शिवसेनेची जिल्हा बैठक झाली. बैठकीला शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार किशोर पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, युवा सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख कुणाल दराडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख महेश खैरनार, प्रकाश वाणी, मुंबईचे संकल्प श्रीवास्तव, मकरंद तक्ते, नगरसेवक सुनील महाजन, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील, नाना महाजन, अमोल पाटील, शिवराज पाटील उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पक्षाचे विविध उपक्रमदेखील सुरू करावेत. सदस्य नोंदणी, वॉर्ड तेथे शाखा यांसारख्या उपक्रमांना प्रतिसाद वाढत आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने आपल्याला विशेष तयारी करून काही चुका टाळाव्या लागणार आहेत, असेही ते म्हणाले.

आमदार किशोर पाटील यांनी दौऱ्याची सुरवात पाचोऱ्यातून करण्याची मागणी केली. जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी पक्षीय संघटनेच्या उपक्रमांत कार्यकर्त्यांनी सहभाग वाढविण्याचे आवाहन केले. युवा सेनेचे संपर्कप्रमुख कुणाल दराडे यांनी जनआशीर्वाद यात्रेची रूपरेषा सांगितली. तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा परिषदेचे माजी गटनेते विश्वनाथ पाटील यांनी आभार मानले.

जनतेच्या विश्‍वासाला साथ द्या : सावंत
जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत म्हणाले, की पक्षीय संघटनेतील उपक्रमांत भगवा सप्ताह, सदस्य नोंदणी, जुलैत विमा कंपनीवर काढण्यात येणारा मोर्चा याबाबत मार्गदर्शन केले. जनतेच्या विश्वासाला साथ देऊन दौरा यशस्वी करा, असे निर्देश बैठकीत दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray visit to Jalgaon