हलगर्जी करणारी आणखी  चार रेशन दुकाने रद्द 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

राज्यात जवळपास एप्रिल 2018 पासून पॉस यंत्राद्वारे रेशन दुकानावरील धान्य वितरण सुरू झाले आहे. एक वर्षानंतरही अनेक रेशन दुकानदार पॉस यंत्राद्वारे धान्य वितरण करण्यास टाळाटाळ करत असल्याने उघडकीस आल्याने पुरवठा विभागाने 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी धान्य वितरण करणाऱ्या रेशन दुकानदारांविरोधात तपासणी व कारवाई सुरू केली आहे.

नाशिक - पॉस मशिनद्वारे 50 टक्केही धान्य वितरण न केल्याच्या आरोपावरून प्रशासनाने गुरुवारी (ता. 27) आणखी चार रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्याच्या नोटिसा बजावल्या. त्यामुळे धान्य वितरणातील हलगर्जीबद्दल परवाने रद्द केलेल्या दुकानांची संख्या सहा झाली आहे. 

राज्यात जवळपास एप्रिल 2018 पासून पॉस यंत्राद्वारे रेशन दुकानावरील धान्य वितरण सुरू झाले आहे. एक वर्षानंतरही अनेक रेशन दुकानदार पॉस यंत्राद्वारे धान्य वितरण करण्यास टाळाटाळ करत असल्याने उघडकीस आल्याने पुरवठा विभागाने 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी धान्य वितरण करणाऱ्या रेशन दुकानदारांविरोधात तपासणी व कारवाई सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी धान्य वितरण करणाऱ्या दोन रेशन दुकानांचे परवाने रद्द केले होते. या आठवड्यात गुरुवारी नाशिक शहरातील तीन आणि येवला येथील एक याप्रमाणे आणखी चार रेशन दुकानांचे परवाने रद्द केले. 

शहरातील जुने नाशिक भागातील नवापुरा कन्झुमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी, स्वानंद महिला बचतगट आणि समीर खैरनार या दुकानांचा परवाना रद्द केला. येवला भागातील किरण वडे यांच्या रेशन दुकान क्रमांक 130 चा परवाना रद्द केला. 

धान्य वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी पॉस यंत्राद्वारे धान्य वितरण सुरू केले आहे. या वितरणात हलगर्जी करणाऱ्या रेशन दुकानांवर कारवाईची मोहीम यापुढेही अशीच सुरू राहील. 
- श्रीनिवास अर्जुन, जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The administration has canceled the four ration shops