नर्मदा काठावरील 4 शाळांना प्रशासकीय मान्यता

ZP schools
ZP schoolsesakal

नंदुरबार : वर्षानुवर्षे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नर्मदा काठावरच्या मुलांची शैक्षणिक परवड आता थांबली असून, जिल्हा परिषदेच्या चार शाळांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षाचा सुरवातीचा पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

नर्मदाकाठ नंदुरबार जिल्ह्यातील शेवटचा टोक समजला जातो. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना अद्याप पर्यंत परिसरात पुरेशा प्रमाणात दळणवळणाची साधने उपलब्ध नाहीत. त्यातच शैक्षणिक सुविधा उपलब्ध असून नसल्यासारखे आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील मुलांमध्ये शिक्षणाची आवड असून, सुद्धा त्यांच्या हक्काच्या शैक्षणिक अधिकारापासून वंचित राहावे लागत होते.

ZP schools
पहिली ते चौथीचे शिक्षकांना घ्यावे लागणार ज्यादा तास! लेखन, वाचन, आकडेमोडीचा होणार सराव

जिल्हा परिषद भांग्रापाणी गटाच्या सदस्या बाजूबाई किरसिंग वसावे यांनी सर्वसाधारण सभेत नर्मदा काठावरील दुर्गम भागात शाळा सुरू करण्याच्या प्रश्न वेळोवेळी उपस्थित करून अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी व शिक्षण सभापती अजित नाईक यांना निवेदने दिली. माजी सदस्य किरसिंग वसावे यांनी देखील पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी वेळोवेळी भेटीगाठी घेत समस्या मांडल्या. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाच्या लाभ देण्यात येईल. कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही. अतिदुर्गम भागातील नर्मदाकाठवरील मुलांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण करून देण्याचे आश्वासन देत उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले.

शिक्षकांची नियुक्ती

अक्कलकुवा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मांडवा केंद्रात सिपानपाडा, दुडापाडा, पिपलापाडा, उंबरपाड शाळांना मंजुरी देण्यात आल्यानंतर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिपानपाडा येथे रोहिदास सरदार पावरा, दुडापाडा येथे कांतीलाल अग्रेशा पावरा, पिपलापाडा येथे परमानंद सारख्या कोकणी, उंबरपाडा येथे अमोल मनोहर ठीगले यांची तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

ZP schools
जिल्हा परिषद शाळांचा उपस्थिती भत्ता बंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com