पाणी भरण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

सकाळी घरात पाणी नसल्याचे पाहून गावातील शेतमजूर मांगू पाटील यांचा मुलगा राहूल मांगू पाटील (वय 14) पाणी भरण्यासाठी विहिरीवर आला. एरवी धुणे धुण्याच्या किंवा जनावरे धुण्याच्या निमित्ताने विहिरीभोवती गर्दी असते. मात्र सकाळची वेळ असल्याने राहुल आला त्यावेळी विहिरीजवळ कोणीही नव्हते. दरम्यान विहिरीतून पाणी भरत असताना पाय घसरल्याने राहुल विहिरत पडला. त्यानंतर अर्ध्या तासाने काही युवक विहिरीजवळ आले. त्यामुळे राहुल विहिरीत पडल्याचे आढळले. तोपर्यंत राहुलचा मृत्यू झाला होता.

विराणे - पिण्याचे पाणी भरण्यासाठी नव्यानेच खोदण्यात आलेल्या गावठाण विहिरीत पडल्याने एका किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मालेगाव तालुक्‍यातील काटवन परिसरातील वळवाडी येथे घडली आहे.

वळवाडी गावात पाण्याची भीषण टंचाई आहे. ग्रामपंचायतीने तलावाजवळ पंधरा फूट खड्डा खोदून विहिर तयार केली आहे. तलावापासून दहा फूट अंतरावर असल्याने सध्या विहिर पाण्याने पूर्णपणे भरली आहे. सकाळी घरात पाणी नसल्याचे पाहून गावातील शेतमजूर मांगू पाटील यांचा मुलगा राहूल मांगू पाटील (वय 14) पाणी भरण्यासाठी विहिरीवर आला. एरवी धुणे धुण्याच्या किंवा जनावरे धुण्याच्या निमित्ताने विहिरीभोवती गर्दी असते. मात्र सकाळची वेळ असल्याने राहुल आला त्यावेळी विहिरीजवळ कोणीही नव्हते. दरम्यान विहिरीतून पाणी भरत असताना पाय घसरल्याने राहुल विहिरत पडला. त्यानंतर अर्ध्या तासाने काही युवक विहिरीजवळ आले. त्यामुळे राहुल विहिरीत पडल्याचे आढळले. तोपर्यंत राहुलचा मृत्यू झाला होता. राहुल हा मांगू पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. मांगू पाटील यांना दोन विवाहित मुलींसह तीन मुली आहेत.

या घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले असून या घटनेला प्रशासनाचा निष्काळजीपणाच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. अनेकवेळा मागणी करूनही पाणीपुरवठ्याच्या ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. गावाच्या पूर्वेकडील तलावाजवळ असलेल्या विहिरीतून गावातील नागरिक डोक्‍यावरून पाणी घेऊन जातात. गावातील पाणीपुरवठ्याची "नऊ गाव पाणी पुरवठा योजना' धूळ खात पडली आहे. मोसम नदीपात्रात दोन विहारी खोदून काटवनातील नऊ गावांना पाणी पुरवठ्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. परंतु कोट्यवधींची योजना शोभेची बाहुली बनली आहे. 40 वर्षे झाली तरी गावाची पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. अजून किती बळी जातील व प्रशासन कधी घराजवळ पाणी देईल याबाबत चिंता व्यक्त करत ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे.

Web Title: Adolescent boy killed in well