विक्रीस दोन महिने उलटूनही हरभऱ्याच्या पैशांची प्रतीक्षाच

devare
devare

धुळे (म्हसदी) : केंद्र शासनाने 2017-18 हंगामात नाफेडतर्फे हमीभावाने हरभरा खरेदी केला. परंतु हरभरा विक्री करुन तब्बल दोन महिने उलटूनही पैशासांठी शेतकऱ्यांना अजूनही 'खो' दिला जात आहे. पैसे मिळतील एवढे शासकीय शैलीचे उत्तर ऐकून बळीराजाला माघारी फिरावे लागत आहे. खरिप हगांमासाठी पैशांची चणचण असतांना स्वतःचे पैसे असतांनाही शेतकऱ्यांस हात चोळत बसत प्रतीक्षा करावी लागत. 

'निसर्गाने अडवले तर शासन तारते' असे म्हटले जाते. दुसरीकडे शासकीय कामाच्या कासवगतीचा फटका जिल्ह्यातील हरभरा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. खाजगी व्यापारी कमी दरात हरभरा खरेदी करत होते.अशावेळी शासनाने नाफेडतर्फे 4400 रुपये प्रती क्विंटल हरभरा खरेदी केला. तोही एकरी साडेचार क्विंटलच. देऊर(ता.धुळे)येथील अशोक उत्तम देवरे या शेतकर्यांने पाच क्विंटल हरभरा विक्रीसाठी नेला. त्यातून केवळ साडेचार क्विंटल हरभरा खरेदी करत अवघा पन्नास किलो हरभरा घरी परत आणावा लागला. असे अनेक अनुभव, व्यथा पैशांची प्रतीक्षा करणारे शेतकरी 'सकाळ'कडे व्यक्त करत आहेत. धुळे जिल्ह्यात हजारो हेक्टर हरबरा पेरणी झाली आणि उत्पन्नही बऱ्यापैकी झाले.खाजगी व्यापारी हरभरा केवळ अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये क्विंटल दराने खरेदी करत होता. परंतु शासनाने दिलास देत नाफेडतर्फे चार हजार चारशे प्रती क्विंटल दराने खरेदी केला.

एकवीस दिवसात शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असे सांगूनही दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून शेतकऱ्यांना स्वतःच्या पैशांची प्रतीक्षा करावी लागत आहे. शासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत. मृग नक्षत्रांच्या अंतिम चरणात काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. शेतकरी अंतरमशागतीकडे वळला आहे.बी-बियाणे,रासायनिक खते, मजूरी व शेतीकामाच्या तत्सम कामासाठी पैशांची जुळाजुळव करत आहे.यासाठी हरभरा विक्री झालेले पैसे मिळावेत म्हणून शेतकरी खरेदी केलेल्या केद्रांकडे तगादा लावत आहेत.

सर्वच बाबतीत शेतकरऱ्यांची अडवणूक होते. मोठा आर्थिक खर्च करत रब्बीत हरभरा पिकवला.नाफेडमध्ये विक्री होऊन दोन महिन्यापेक्षा अधिक दिवस झाले. खरिप हगांमासाठी कर्ज काढून वा हातउसनवारीने
पैसे घ्यावे लागले. अशावेळी हरभर्याचे पैसे मिळाले तर आधार मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com