भुजबळ मंत्री झाले अन्‌ 'इथल्या' खड्ड्यांना "अच्छे दिन' आले....

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 December 2019

लासलगाव, पिंपळगाव व निफाड ही गावे मोठी असून, लाइफलाइन असलेल्या या रस्त्यावर मोठी वाहतूक होते. या रस्त्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याचे अस्तित्वच संपुष्टात आले. येवला- लासलगाव व निफाड मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. निफाड तालुक्‍यातील रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. या रस्त्यांवरून गाड्यांनी ये- जा करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे.

नाशिक : नाशिक - औरंगाबाद महामार्गावर शिवरे फाट्यावरील खड्डे बुजविणे सुरू झाले आहे. ते पाहून आता छगन भुजबळ यांचा करिश्‍मा दिसेल, असे बोलताना वाहनचालक दिसून आले. भुजबळ कॅबिनेट मंत्री झाले अन्‌ खड्ड्यांना "अच्छे दिन' आले, असेच म्हणावे लागेल. 

छगन भुजबळ मंत्री होताच सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दुरुस्ती   

लासलगाव व पिंपळगाव बसवंत येथे कांद्यासाठी सर्वांत मोठ्या बाजारपेठा आहेत. या रस्त्यावरून रोज कांदा लिलावासाठी मोठ्या प्रमाणात वाहने ये- जा करतात. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे चालकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. लासलगाव, पिंपळगाव व निफाड ही गावे मोठी असून, लाइफलाइन असलेल्या या रस्त्यावर मोठी वाहतूक होते. या रस्त्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याचे अस्तित्वच संपुष्टात आले. येवला- लासलगाव व निफाड मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. निफाड तालुक्‍यातील रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. या रस्त्यांवरून गाड्यांनी ये- जा करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. या मार्गाने एकदा गेलेली व्यक्ती दुसऱ्यांदा तेथून परत येण्याची हिंमत करणार नाही. वाहन कुठूनही काढण्याचा प्रयत्न करा, ते खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. मात्र, दुसरा पर्यायही नसल्याने याच मार्गाने ये- जा करावी लागत आहे. 
 
Image may contain: sky, outdoor and nature

निफाड : रस्त्यांवरील खड्ड्यांना "अच्छे दिन'... नाशिक- औरंगाबाद महामार्गावर खड्डे बुजविताना कामगार. 

हेही वाचा > मळ्यात गेलेले आजोबा-नातू परतलेच नाही...शोध घेतल्यावर ग्रामस्थांना धक्का...

खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान...
तालुक्‍यातील रस्त्यांवरील सुमारे पाच किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुमारे पंचवीस ते तीस मिनिटे लागत असल्याने चालक त्रस्त झाले आहेत. शिवाय खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, वाहनमालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडले असून, किरकोळ जखमी झाले आहेत. 
 
हेही वाचा > आई फोनवर बोलत होती..अन् बाळ रांगत गेलं बाथरुममध्ये....नंतर आई येऊन बघते तर काय.....

साइटपट्ट्या खोल 
रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साइडपट्ट्या रस्त्यापासून सुमारे एक फूट खोल गेल्याने मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. रस्त्यांवर मोठी वाहतूक असते. मात्र, त्याकडे बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसते. 

PHOTOS : कोंबडा माशाची मिजासच भारी!...'इतक्या' दराचा यंदा तुर्रा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Chhagan Bhujbal became Minister Repairs by the Public Works Department Nashik Marathi News