काश्मीरमध्ये हल्ला झाला; पण धुळ्यात मोदी भूमिपूजन करणारच!

काश्मीरमध्ये हल्ला झाला; पण धुळ्यात मोदी भूमिपूजन करणारच!

धुळे- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्याची घटना घडल्याचे कळताच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे तातडीने गुरुवारी रात्री दिल्लीला रवाना झाले. शाहिद जवानांच्या बलिदानाला आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाहीत, दहशतवादी संघटना आणि पाकिस्तान ला चोख उत्तर दिले जाईलच अशी भावना डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, उद्या (ता.16) फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नियोजित जाहिर सभा आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती डॉ.सुभाष भामरे यांनी नवी दिल्ली येथून आज दूपारी दिली आहे. 

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभुमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा (ता.16) फेब्रुवारी रोजी होणारा धुळे जिल्हा दौरा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतू दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यासाठी देशाच्या सैन्य दलाला पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्रालयाने आवश्यक त्या सुचना देत पुर्णपणे खुली सुट देत असल्याचे स्पष्ट केले आहे.

देशावर झालेला हा हल्ला भारत सरकार कदापी सहन करणार नाही. या हल्ल्याला योग्य वेळी, चोख प्रतिउत्तर देण्यात येणार आहे. भारतीय सैन्य दल यासाठी सक्षम असल्याचे संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ना.नितीन गडकरी आदी मान्यवर उद्या (ता.16) दुपारी 1 वाजता नियोजित कार्यक्रमानुसार धुळ्याला येतील. त्यांच्या हस्ते मनमाड-धुळे-इंदौर रेल्वेमार्ग, सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजना, अक्कलपाडा धरण ते धुळे शहर पाईपलाईन योजनांचे भूमिपूजन आणि विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येईल, तसेच नियोजित जाहिर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी  संबोधीत करतील असेही डॉ. सुभाष भामरे यांनी कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com