आई - वडीलांनंतर शिक्षकच आपला खरा गुरु : विवेक उगलमुगले

teacher
teacher

सटाणा - आई - वडीलांनंतर शिक्षकच आपला खरा गुरु असतो. शिक्षक एक पीढी घडविण्याचे महान कार्य करीत असल्याने शिक्षकाला प्रत्येकाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असते. शिक्षक हा मातीच्या गोळ्याला आकार देणारा एक मुर्तीकारच असतो, असे प्रतिपादन जेष्ठ समिक्षक विवेक उगलमुगले यांनी काल बुधवार (ता. ५) रोजी येथे केले.
येथील सप्तपदी मंगल कार्यालयात गिरणा गौरव प्रतिष्ठान व नो प्रॉब्लेम परिवारातर्फे शिक्षकदिनानिमित्त आयोजित कसमादे परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना 'आदर्श गुरुजन' पुरस्कार प्रदान सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून समिक्षक श्री. उगलमुगले बोलत होते. नगराध्यक्ष सुनिल मोरे, देवमामलेदार देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, बागलाण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे, ज्येष्ठ पत्रकार अंबादास देवरे, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सोपान खैरनार, गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव, शि‌क्षण विस्तार अधिकारी पी.आर.जाधव, नगरसेविका डॉ. विद्या सोनवणे, महेश देवरे, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, नंदकिशोर शेवाळे आदी प्रमुख पाहुणे होते. श्री. उगलमुगले म्हणाले, वाचनातुनच आपला विकास होत असल्याने शिक्षकांनी वाचनावर भर दिला पाहिजे शिक्षकांवरच विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असल्याने प्रामाणिकपणे ज्ञानदान करावे, असे आवाहनही केले. यावेळी बोलताना नंदकिशोर शेवाळे म्हणाले, तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी निस्वार्थीपणे झोकून देऊन काम करणाऱ्या गुरुवर्यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान व नो प्रॉब्लेम परिवारातर्फे गेल्या दहा वर्षांपासून गौरविले जात असून त्यामुळे शिक्षकांमध्ये काम करण्याची उर्मी येते. 

कार्यक्रमास बाजार समिती संचालक केशव मांडवडे, निवड समितीचे अध्यक्ष राजेंद्र निकम, मुख्याध्यापक रविंद्र भदाणे, संदिप कोठावदे, आर. डी. देवरे, बा.जी.पगार, प्रा. किरण दशमुखे, प्रकाश नेरकर, रमाकांत भामरे, विनीत पवार, एस. टी. भामरे, एस. पी. जाधव, भास्कर पगार, दिनेश सोनवणे, आर. डी. भामरे, शुभदा सोनवणे, अमित भामरे, निलेश भामरे आदींसह शिक्षक व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. पल्लवी सोनवणे यांनी सुत्रसंचलन केले तर केदाभाऊ महिरे यांनी आभार मानले.

'आदर्श गुरुजन' पुरस्कारप्राप्त शिक्षक पुढीलप्रमाणे : 
सचिन शेवाळे (ब्राह्मणगाव), दत्तराज ह्याळीज (निताणे), प्रा. अशोक देशमुख (देवळा महाविद्यालय), प्रा. योगेश पाटील (आसखेडा), सुनिता पगार (डांगसौदाणे), रवींद्र देवरे (दसवेल), संजय ठोके (सप्तशृंगीगड), राजेंद्र सुर्यवंशी (खर्डे), दिपक ठाकरे (खिरमाणी), राजेंद्र सुर्यवंशी (बोरगाव ता.सुरगाणा), किरण आहिरे (ढवळीविहीर आसखेडा), दिंगबर आहिरे (मुंजवाड), सुनील एखंडे (लोहणेर). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com