धनगरांना दिलेल्या सवलती विरोधात आदिवासी आक्रमक  

mokhada
mokhada

मोखाडा - शासनाने धनगरांना आदिवासी समाजाप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मोखाड्यातील आदिवासी समाज संघटनेने आक्रमक होऊन, खोडाळा बाजारपेठेत निषेध रॅली काढली होती. तसेच बाजारपेठ दुपारपर्यत बंद ठेवून, शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन केले आहे. धनगरांच्या घुसखोरी च्या आणि आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला आहे. 

आदिवासी समाज संघटना खोडाळा शाखेचे अध्यक्ष ऊमाकांत हमरे (बाबा) यांच्या नेतृत्वाखाली शासनाने धनगर समाजाला, आदिवासी समाजाच्या सवलती दिल्याच्या निषेधार्थ खोडाळा बाजारपेठेत निषेध रॅली काढली. खोडाळ्यातील इंदिरानगर येथील नाग्या कातकरी समाजमंदिरात सर्व आदिवासी एकत्र येऊन, बाजारपेठेतुन निषेधाचे फलक जळकावुन, धनगर समाजाला दिलेल्या सवलती विरोधात घोषणा देण्यात आल्या आहेत. तसेच आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा देऊन मोर्चेकर्यांनी परिसर दणाणून सोडला होता. धनगर समाज आदिवासी समाजात घुसखोरी करत असुन शासनाने आमच्या सवलती धनगरांना देऊन आमच्या हक्कावर गदा आणली असल्याचा आरोप मोर्चेकर्यांनी केला आहे.

सरकारच्या या निर्णयाविरोधात आदिवासी समाज संघटनेने खोडाळा बाजारपेठ बंद ठेवण्याची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत, आठवडे बाजार असतानाही खोडाळा बाजारपेठ दुपारपर्यत बंद ठेवण्यात आली होती. 

या निषेध रॅलीत खोडाळयाचे सरपंच प्रभाकर पाटील, माजी ऊपसभापती एकनाथ झुगरे, सदाशिव ईधे, संजय साळवे, संदिप थाळेकर, भगवान सावर, काळू भोई, शिवा गोडे, संदीप पाटील, शरद शिंद या सर्व आदिवासी पोट जमातीच्या कार्यकर्त्या सह शेकडो आदिवासी निषेध रॅली त सहभागी झाले होते. 

निवेदन स्वीकारण्यास अधिकारी वेळेत न आल्याने चौकात ठिय्या. निषेध रॅली बसस्थानकाजवळील शिवाजी चौकात आली. मात्र, तहसील कार्यालयांतील अधिकारी वेळेवर निवेदन स्वीकारण्यास न आल्याने, मोर्चेकर्यांनी शिवाजी चौकात च ठिय्या मांडून निषेधाच्या घोषणा दिल्या. सुमारे तास भर केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे आठवडे बाजारासाठी, बाजारहाट करण्यासाठी आलेल्या बाजारकरूंचे हाल झाले आहे. त्यामुळे मोर्चे करी संतप्त झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com