सामाजिक भावना दुखावल्याबद्दल भाग्यश्री नवटक्के यांच्या निलंबनाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

मनमाड - बीड जिल्ह्यातील माझंलागावं येथे प्रोबेशनल पिरियडवर डीवायएसपी म्हणून कार्यरत असलेल्या भाग्यश्री नवटक्के यांनी दलित व मुस्लिम समाजासंदर्भात जातीवाचक वादग्रस्त केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज मनमाड शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)तर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. तसेच नवटक्के यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन मंडल अधिकारी कैलास चौधरी यांना देण्यात आले. यावेळी सर्वपक्षीयातर्फे पाठिंबा देण्यात आला. 

निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात माझंलागावं येथे प्रोबेशनल पिरियडवर पोलिस डीवायएसपी या पदावर  कार्यरत असलेल्या भाग्यश्री नवटक्के यांची दलित व मुस्लिम समाजाच्या विरोधात निंदनिय व जातीवादी वादग्रस्त विधान केल्याची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामुळे दलित व मुस्लिम समाजामध्ये असंतोष पसरला. सदर महिला पोलिस अधिकाऱ्यास तातडीने निलंबित करून कठोर कारवाई करावी. तसेच अनुसूचित जाती जमाती (अट्रोसिटी)व एच. एम. दाखल करण्यासंदर्भात राज्यभरात निषेधार्थ मोर्चे व आंदोलने होत असताना आज त्याचे तिव्र पडसाद मनमाड शहरात उमटले. 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A)तर्फे रिपाइंचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र आहिरे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनकर धिवर, जिल्हा संघटक अनिल निरभवणे, कार्याध्यक्ष गंगादादा त्रिभुवन, आदींच्या नेतृत्वाखाली रिपाई भवनापासून निषेध मोर्चा काढण्यात आला. गांधी चौक, सुभाष रोड, शिवाजी चौक, स्टेशन रोड आंबेडकर पुतळा मार्गे एकात्मता चौकात मोर्चा आला असता यावेळी नवटक्केच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  

यावेळी गंगादादा त्रिभुवन, रिपाई जिल्हा नेते पी आर निळे, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, फिरोज शेख रुख्मिनी आहिरे आदींची भाषणे झाली. यावेळी निषेध मोर्चास राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ, या विविध पक्षांसह फुले शाहू आंबेडकर मुलनिवासी मुस्लिम विचारमंच, वंजारी सेवा संघ, जेष्ठ नागरिक संघ, भारतीय बौद्ध महासभा आदी सामाजिक संघटनातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला.

रिपाई तालुकाध्यक्ष कैलास आहिरे, रिपाई युवक शहराध्यक्ष गुरू निकाळे, जिल्हा नेते दिनकर कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादल जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र घोडेस्वार, बब्बू कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते संजय कटारे, सुरेश आहिरे श्रीकृष्ण पगारे, विलास आहिरे, मिरझा अहमद बेग, नरेंद्र कांबळे, सुरेश जगताप, अनावर शेख, अकिल शेख, जनार्दन वाघ आदींसह रिपाई सह विवीध पक्ष संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Web Title: agitation against bhagyashree navtakke in manmad