जनहित शेतकरी संघटनेचे आंदोलन अखेर मागे

The Agitation of the Janhit Shetkari Sanghatana is finally behind
The Agitation of the Janhit Shetkari Sanghatana is finally behind

मंगळवेढा : तालुक्यातील माचनूर येथील प्रतीक शिवशरणच्या मारेकऱ्यांना अटक करावी आणि पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्यावर कारवाई करावी, यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सुरू असलेले जनहित शेतकरी संघटनेचे आंदोलन आज 24 दिवसानंतर मागे घेण्यात आले.

जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख तालुकाध्यक्ष दामाजी मोरे, बलभीम माळी, तालुका उपाध्यक्ष बिरुदेव ढेकळे शहराध्यक्ष पप्पू दत्तू युवक अध्यक्ष सुहास कलुबर्मे, आबा सावंजी,  सिद्धु नागणे, मधुकर कोंडूभैरी, पोपट पडवळे, सुरेश कट्टे, खंडू माळी, सचिन शिंदे, ज्योती कांबळे, भीमराव मोरे, अनिल रणदिवे, अभिजीत भोसले, सुखदेव डोरले, रघू चव्हाण उपस्थित होते  

प्रतिक शिवशरण या बालकाचे अपहरण करून त्याचा अमानुषपणे खून करण्यात आला. या खून प्रकरणाने तालुक्यातील  खळबळ उडाली. मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके नियुक्त केली असली तरी जनहित शेतकरी  संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू केले होते. यात विविध  संघटनेच्या वतीने पाठिंबा दिला. खर्डा भाकरी,भजन,अर्ध नग्न,घंटानाद,हालगी नाद अशा वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येऊन निषेध व्यक्त केला. पोलिसांच्या  विविध पथकाने या खून प्रकरणाचा तपास केला आणि एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले. तरीही त्यानंतर हे आंदोलन प्रभाकर मोरे त्यांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्यामुळे यांच्यावर कारवाईसाठी सुरू होते. 

वेगळ्या मार्गाने केलेले आंदोलन आंदोलनाचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दखल घेत प्रभाकर मोरे यांची पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेसाठी बदली केली आणि पंढरपूर येथील  अनिल गाडे यांची  पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे या कारवाया दोन कारवाई झाल्यामुळे जनहित शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे घेण्यात आले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com