काळ्या फिती लावून ग्रामपंचायतीचा निषेध

kapadne
kapadne

कापडणे (ता.धुळे) : अतिक्रमित दुकाने काढण्यासंदर्भात  ग्रामपंचायतीने नोटीसा बजाविल्या आहेत. चार दिवसांत केव्हाही अतिक्रमण काढले जाईल, अशी भिती अतिक्रमणधारकांमध्ये निर्माण झाली आहे.

ऐन दिवाळीत अतिक्रमण काढले गेल्यास व्यवसायाचे दिवाळे निघेल. गावातही मोठ्या प्रमाणात मातब्बर लोकांनी अतिक्रमणे गेली आहेत. त्यांना का पाठिशी घालत आहेत. त्यांचेही अतिक्रमणे काढा. पर्यायी जागा द्या. तरच अतिक्रमण काढू. या मागणीकडे पंचायत दुर्लक्ष करीत आहे. म्हणून येथील व्यावसायिकांनी तीन दिवस काळ्या फिती लावून व्यवसाय केला.

या निषेध आंदोलनात व्यावसायिक मेहमुद चांद पिंजारी, सुरैया मेहमुद पिंजारी, शिवाजी रतन सैदाणे, शेवंताबाई सैदाणे, संजय खंडू बोरसे, महेंद्र खोंडे, संगिता संजय बोरसे, देवकाबाई साहेबराव माळी, समाधान माळी, वामन दंगल माळी, आत्माराम भाबडू माळी, दिनेश किशोर माळी, प्रेमराज गुलाब गोसावी, सुनिल छगन सोनार, रमेश लोटन शिंपी, पांडूरंग शालीग्राम पाटील, भरत श्रावण पाटील, रामचंद्र श्रावण पाटील, विजय रतन माळी, विठोबा माळी, बापू माळी, ज्ञानेश्वर माळी आदी सहभागी झालेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com