टायपिंग इन्स्टिट्यूटतर्फे उद्या आझाद मैदानावर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

नाशिक - शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जीसीसी- टीबीसी ही संगणक अर्हता लागू करावी, नोकरभरतीच्या जाहिरातीत जीसीसी- टीबीसीचा समावेश करावा यांसह अन्य मागण्यांसाठी शासनमान्य संगणक टंकलेखन संस्थाचालकांच्या संघटनेतर्फे मंगळवारी (ता. 15) मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन होणार असून, राज्यभरातून साडेतीन हजार, तर नाशिक जिल्ह्यातून दीडशे इन्स्टिट्यूट चालक सहभागी होणार आहेत.

संघटनेतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. या भेटीदरम्यान संघटनेच्या मागण्यांवर विचार करावा, असे पत्र गडकरी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिले होते. तसेच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत त्यांच्यासमोर मागण्या मांडल्या आहेत.

Web Title: agitation by typing institute