तहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा : राजू देसले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

नांदगाव : तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी आज काढण्यात आलेला मोर्चा हा शेवटचा असून यापुढे मोर्चा काढण्याऐवजी तहसिलचा ताबा घेऊन तेथे आंदोलन करू असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य मंडळाचे सदस्य कॉम्रेड राजू देसले यांनी आज दिला. कॉम्रेड राजू देसले, जिल्हाध्यक्ष भास्करराव शिंदे जिल्हा सरचिटणीस देविदास भोपळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने तहसिलवर काढण्यात आलेल्या शेतकरी आदिवासी शेतमजुरांच्या मोर्चासमोर कॉम्रेड देसले यांनी बोलतांना हा इशारा दिला.

शासकीय विश्रामगृहपासून काढण्यात आलेल्या या मोर्चाची सांगता जुन्या तहसिल कार्यालयात झाली. तालुक्यात पाऊस नसल्याने दुष्काळाचे संकट उभे राहिले असतांनाही प्रशासकीय यंत्रणा ढिम्मच असल्याचा आरोप मोर्च्यात सहभागी झालेल्या वक्त्यांनी आपल्या भाषणात केला. वन हक्क जमिनीच्या प्रश्नावर चालढकल सुरु असून अद्यापही ज्यांना जमिनी देण्यात आल्यात त्या आदिवासींना प्रमाणपत्रे दिली गेली नाहीत. याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले तालुका दुष्काळी घोषित करावा, जनावरांसाठी छावण्या सुरु कराव्यात मजुरांना काम मिळावे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ,पेट्रोल-डिझेल-गॅस वाटपात सामान न्यायाने वाटप व्हावे, नार-पारचे पाणी तालुक्याला मिळावे, कांदा पिकास हमीभाव द्यावा आदी मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसिलदार मीनाक्षी बैरागी यांना देण्यात आले. साधना गायकवाड विजय दराडे देवचंद सुरसे प्रकाश पवार, राजू सोनवणे, जयराम बोरसे, रतन बोरसे राजू निकम कोंडीराम माळी सुनीता कुलकर्णी निंबा आहेर, शांताराम पवार सुमनबाई पवार आदी भाकपा व किसन सभेचे कार्यकर्ते तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतमजूर आदिवासी मोठ्या संख्यने या मोर्चात सहभागी झाले होते.

Web Title: agitation will be organized in tahsil in nandgav