गुलाबी बोंड अळीले बिलकुल नका भिऊ...तिच्या बंदोबस्तासाठी काळजी घेऊ!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

येवला : नमस्कार ताई...राम राम भाऊ...गुलाबी बोण्ड अळीले बिलकुल नका भिऊ...तिच्या बंदोबस्तासाठी मात्र पुढील काळजी घेऊ...असा संदेश फिरवत कृषी विभागाने आगामी हंगामात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचे आक्रमण होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

येवला : नमस्कार ताई...राम राम भाऊ...गुलाबी बोण्ड अळीले बिलकुल नका भिऊ...तिच्या बंदोबस्तासाठी मात्र पुढील काळजी घेऊ...असा संदेश फिरवत कृषी विभागाने आगामी हंगामात कपाशीवर गुलाबी बोंड अळीचे आक्रमण होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

यावर्षी जोरदारपणे कापसाचे पिक आले होते. मात्र सरतेशेवटी लाल्या रोगाने आक्रमण केल्याने शेतातील उभ्या पिकाची वाट लागली होती. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावला जाऊन दोन ते हजार कोटीवर चुना राज्यातील शेतकर्यांना लागला आहे. यामुळे हजार कोटीची मदत देण्याची वेळ सरकारवर आली आहे. याचमुळे कृषी विभागाने मोहीम हाती घेऊन गावोगावी जनजागृती चालवली आहे. शेतकऱ्यांच्या बैठका,कार्यक्रम,मेळावे यासह सोशल मीडीयाद्वारे देखील तालुका कृषी अधिकारी अभय फलके व त्यांचे सहकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

कापूस लागवड केलेल्या शेताची खोल नांगरटी त्वरित करावी व ज्या शेतात मागील वर्षी कपाशी घेतली त्या शेतात कपाशी लागवड टाळावी,पूर्व हंगामी कापूस लागवड टाळावी,कापूस पात्या फुल येण्याच्या अवस्थेत गुलाबी बोण्ड अळीचे कामगंध सापळे लावून नियमित सापड्यात अडकलेल्या नर पतंगांची निरीक्षणे घ्यावी,कापूस पिकात चवळी, झेंडू तुरीच्या ओळीत ज्वारीचा इरवा आवर्जून टाकावा,कापूस पिकावरील किडीच्या आर्थिक नुकसान पातळी नुसार फक्त शिफारशी नुसारच रसायनांची फवारणी करावी,फवारणी करतांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक दक्षता घ्यावी, फरदड न घेता जानेवारी अखेर वेचणी संपवून शेतात जनावरे चरण्यास सोडावी,अवशेष यंत्राद्वारे (स्लॅशर )बारीक करून कंपोस्ट तयार करावे अथवा जाळून टाकावे,पुढील वर्षी पिक फेरपालट करावा,कीडरोग नियंत्रणासाठी एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनाचा अवलंब करावा,बी टी कापूस बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून पक्के बिल घेऊनच खरेदी करावे, अनोळखी अनधिकृत व्यक्तीं कडून बियाणे खरेदी टाळावी,बीटी कपाशी भोवती ऱेफुजी रांगा न चुकता लावाव्या, अफवा फसव्या जाहिराती यांना बळी पडू नये असे आवाहन कृषी विभागाकडून होत आहे.येता खरीप हंगाम समस्त अन्नदात्यांना सुख समृध्दीचा जावो या शुभेच्छा देखील दिल्या जात आहे.

Web Title: agriculture department campaigns for awareness