Ahimsa Run : धुळ्यात 2 एप्रिलला अहिंसा रन-2023; इथे करा नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule News

Ahimsa Run : धुळ्यात 2 एप्रिलला अहिंसा रन-2023; इथे करा नोंदणी

धुळे : देशविदेशात ४ एप्रिलला भगवान महावीर कल्याणक महोत्सव साजरा होईल. यानिमित्त अहिंसा, एकता, प्रेम, आदर, शांती तत्त्वांचा संदेश देण्यासाठी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनतर्फे धुळे शहरासह आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाच दिवशी २ एप्रिलला रविवारी अहिंसा रन-२०२३ (Ahimsa Run 2023) होईल. (Ahimsa Run 2023 on April 2 in Dhule news)

तत्पूर्वी, वातावरणनिर्मितीसाठी शहरातील गरुड मैदानावर रविवारी (ता. १२) सकाळी सहाला प्रॅक्टिस रन होणार आहे. यात धुळेकरांना सहभागाचे आवाहन आयोजकांनी केले.

अहिंसा रनबाबत जैन स्थानकात शुक्रवारी (ता. १०) झालेल्या पत्रकार परिषदेत जैन संघटनेच्या येथील मुख्य सचिव स्वाती संघवी, उपाध्यक्षा मानसी मुथा, श्‍वेता बाफना, सहसचिव सोनल बरडिया, दीपाली साभद्रा, कोशाध्यक्षा पूजा भन्साली यांनी सांगितले, की अहिंसा रनची गीनिज आणि लिम्का वर्ल्ड बुकमध्ये नोंद झाली आहे.

अहिंसा रनसाठी आवाहन

शहरात २ एप्रिलला रविवारी मालेगाव रोडवरील श्री अग्रसेन महाराज स्मारकाजवळील गिंदोडिया कम्पाउंड येथून पहाटे पाचला अहिंसा रन सुरू होईल. रन तीन, पाच, दहा किलोमीटरसाठी असेल. यात १२ ते ९९ वयोगटातील महिला व पुरुषांना सहभाग घेता येईल.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

झुम्बा डान्सवर वॉर्म-अप झाल्यावर गिंदोडिया कम्पाउंड ते गणपती पॅलेस रोडमार्गे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, तेथून आग्रा रोडमार्गे पाचकंदील, गांधी पुतळा, पंचवटी, नेहरू चौक, दत्तमंदिर, नगावबारी चौफुली व तेथून याच मार्गाने गिंदोडिया कम्पाउंड येथे अहिंसा रनचा समारोप होईल. या मैदानावर नोंदणी केलेल्या महिला, पुरुषांना टी-शर्ट, मेडल, कॅप, गुडी बॅग, रिफ्रेशमेंट व ई-प्रमाणपत्र दिले जाईल.

यात सहभागासाठी www.ahimsarun.com किंवा https://registrations.indiarunning.com/ahimsa-run-dhule या लिंकवर अल्पदरात नोंदणी करणे बंधनकारक आहे. धुळेकरांनी या ऐतिहासिक रनमध्ये (मॅरेथॉन) सहभागासाठी अधिकाधिक संख्येने नावनोंदणी करावी, असे आवाहन आहे.

गरुड मैदानावर प्रॅक्टिस

या पार्श्वभूमीवर शहरातील गरुड मैदानावर रविवारी (ता. १२) सकाळी सहाला प्रॅक्टिस रनचा कार्यक्रम होईल. महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी व अन्य मान्यवर प्रमुख पाहुणे असतील. या वेळी अहिंसा रनचे पोस्टर लॉन्च व झुम्बा डान्स होईल.

अहिंसा रनच्या आयोजनाचा मान जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या धुळ्यातील महिला पदाधिकाऱ्यांना मिळाला आहे. इच्छुकांनी नावनोंदणीसाठी स्वाती योगेश संघवी यांच्या ९४२२७ ९८००६ आणि श्‍वेता बाफना यांच्या ९४२२२ ८८६४० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. ऑर्गनायझेशनच्या येथील अध्यक्षा कल्पना सिसोदिया, कांतिलाल चोरडिया यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

टॅग्स :DhuleMarathon