प्राथमिक शिक्षणाधिकारी अहिरेंना निलंबित करून चौकशी करावी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

नाशिक - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी खासगी शिक्षण संस्थांना आरटीई प्रमाणपत्र प्रस्तावांवर निर्णय न घेणे, दफ्तरदिरंगाई करणे, तसेच मुख्याध्यापकांकडून पैशाची मागणी करून भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याचा ठपका 

ठेवण्यात आला आहे. यामुळे त्यांचे तातडीने निलंबन करून विभागीय चौकशी करावी, अशी शिफारस शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली. 

नाशिक - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी खासगी शिक्षण संस्थांना आरटीई प्रमाणपत्र प्रस्तावांवर निर्णय न घेणे, दफ्तरदिरंगाई करणे, तसेच मुख्याध्यापकांकडून पैशाची मागणी करून भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याचा ठपका 

ठेवण्यात आला आहे. यामुळे त्यांचे तातडीने निलंबन करून विभागीय चौकशी करावी, अशी शिफारस शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली. 

श्री. अहिरे यांच्याविरोधात जाधव यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्याला उत्तर देताना अहिरे यांनी शिक्षण उपसंचालकांवरच आरोप केल्याने हा वाद पेटल्याचे सांगण्यात येत आहे. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्याविरोधातील पत्र शिक्षण आयुक्तांना पाठविले असून, त्यात मुख्याध्यापक संघाच्या सहविचार सभेत झालेल्या चर्चेचे इतिवृत्त जोडले आहे. त्या सहविचार सभेत मुख्याध्यापक संघाने आरटीई प्रमाणपत्र वेळेत दिली जात नसल्याबद्दल तक्रार केली होती. बैठकीत त्यांच्याविरोधात आरटीई प्रमाणपत्र देण्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा जाहीर आरोप झाला होता. यावर शिक्षण उपसंचालकांनी त्यांच्याविरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांना पत्र दिले होते. त्या पत्राचा खुलासा करताना शिक्षणाधिकारी अहिरे यांनी शिक्षण उपसंचालकांनी निकष काटेकोरपणे न पाळता मुख्याध्यापक संघाची मागणी मान्य करावी, असे निर्देश दिल्याचे म्हटले आहे. यामुळे शिक्षण उपसंचालकांनी अहिरे यांनी केलेले आरोप चुकीचे व दिशाभूल करणारे असून, मी त्यांना कायद्याचे पालन करून निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे शिक्षण उपसंचालक जाधव यांनी शिक्षण आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. शिक्षण उपसंचालकांनी लिहिलेल्या पत्रात श्री. अहिरे यांनी आरटीई प्रमाणपत्र प्रस्तावावर निर्णय घेतला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या विषयावरून मुख्याध्यापक संघाच्या सहविचार सभेत झालेल्या वादावादीचा व आरोपांचा सविस्तर उल्लेख केला आहे. त्या सभेत श्री. अहिरे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांच्या हातातून ध्वनिक्षेपक हिसकावून घेणे व जबाबदार विधाने करणे याला आक्षेप घेतला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंभरकर यांनी अहिरे यांच्याकडील आस्थापनेचा कार्यभार काढून घेतल्याचाही उल्लेख करीत त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करून विभागीय चौकशी करावी, असे म्हटले आहे. 

Web Title: Ahirem should be examined by suspended