अंदाजपत्रकात 'स्थायी'कडून बारा कोटींची वाढ 

विठ्ठल लांडगे
बुधवार, 28 मार्च 2018

महासभेला 631 कोटींचे अंदाजपत्रक सादर; आजपासून सभागृहात सविस्तर चर्चा 

नगर - महानगरपालिका प्रशासनातर्फे 2018-19 या आर्थिक वर्षासाठी स्थायी समितीकडे 19 मार्चला 619 कोटी रुपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर झाले. त्यात बारा कोटी 38 लाख रुपयांची वाढ सुचविली असून, महासभेला आज 631 कोटी 38 लाख रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीच्या सभापती सुवर्णा जाधव यांनी सादर केले. अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज सभा तहकुब करण्यात आली. उद्यापासून (ता.29) अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा होईल, असे महापौर सुरेखा कदम यांनी घोषित केले. 

महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात एकूण महसुली उत्पन्न 149 कोटी 73 लाख गृहीत धरण्यात आले होते. त्यात स्थायी समितीने 12 कोटी 40 लाख रुपयांची वाढ सुचविली. त्यामुळे वर्षअखेरीस 162 कोटी 14 लाख रुपयांचे उत्पन्न गृहीत धरण्यात आले आहे. बांधील खर्चाच्या बाजुला प्रशासनाने 13 कोटी 39 लाखांचा खर्च गृहीत धरला आहे. त्यात समितीने तब्बल 16 कोटी 49 लाखांची वाढ सुचविली असून, वर्षअखेरीस हा खर्च 25 कोटी 79 लाख रुपये गृहीत धरण्यात आलेला आहे.

शास्तीमाफीच्या ठरावाबाबत स्थायी समितीची दुटप्पी भूमिका
अर्थसंकल्पात मालमत्ताकर शास्तीशुल्कापोटी 48 कोटी रुपयांचे उत्पन्न प्रशासनाने गृहीत धरले होते. मात्र, शास्तीमाफीचा ठराव करून उत्पन्नाच्या बाजुतून शास्तीशुल्क वगळण्याचा ठराव स्थायी समितीने केला. राज्य निवडणूक आयोगाकडून तो मंजूर करून आणण्याची जबाबदारी आयुक्त घनश्‍याम मंगळे यांनी "स्थायी'च्या सभेत घेतली. प्रत्यक्षात तो ठराव राज्य सरकारकडे गेलाच नाही. आज महासभेत मुळ अर्थसंकल्प सादर होताना त्यात तब्बल 4 कोटी 39 लाख रुपयांची वाढ "स्थायी'नेच सुचविली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे स्थायी समितीच शास्तीशुल्कात दुटप्पी भूमिका घेतल्याचे आज स्पष्ट झाले. 

स्वेच्छा निधीसाठी समिती मेहरबान..! 

  • महापौर : तीन कोटी 
  • उपमहापौर : 75 लाख 
  • सभापती "स्थायी': 75 लाख
  • सभागृहनेता : 25 लाख 
  • विरोधी पक्षनेता : 25 लाख 
  • सभापती "मबाक' : 20 लाख 
  • उपसभापती "मबाक': 15 लाख 
  • नगरसेवक : 12 लाख 
Web Title: ahmednagar corporation budget financial year