#TuesdayMotivation आकाशने पाहिले एक स्वप्न आणि घेतली गगनभरारी!

akash nagre.jpg
akash nagre.jpg

येवला : हिंमत,श्रम अन कष्ट करण्याची तयारी असेल तर यश चालून येते.यशाला कधीही परिस्थिती आड येत नाही अन कितीही स्पर्धा असली तरी जिंकण्यासाठी स्पीडब्रेकर लागत नाही हे दाखवून दिले आहे. येथील आकाश नागरे या युवकाने..अभियंता शाखेची पदविका उत्तीर्ण होताच त्याने राज्य परिवहन महामंडळात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी परीक्षा दिली.अन खेळण्या-बागडण्याच्या वयातच आयुष्यातील पहिल्याच प्रयत्नांत सोनेरी यश मिळवून आकाशने गगन भरारी घेतली आहे.

परिवहन महामंडळाच्या परीक्षेत आकाश नागरे राज्यात दुसरा 

पदवी-पदवीका संपादन केली की युवकांना वेध लागतात ते नोकरीचे..या प्रतीक्षेत अनेक संधी आपलीसी करण्याचा प्रयत्नही होतो. परंतु अनेकदा त्याला हुलकावणीच मिळते. मात्र या सगळ्या गोष्टींना आकाशने छेद दिला आहे. दहावीची परीक्षा ८४ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी येथील एसएनडी तंत्रनिकेतन मध्ये ७० टक्के गुण मिळवत अभियांत्रिकी पदविका प्राप्त केली. वडील वाल्मिक न्यायालयात सेवक पदावर नोकरी करतात तर आई गेल्या दहा पंधरा वर्षापासून अल्पबचत प्रतिनिधी म्हणून काम करते. आई-वडिलांच्या या योगदानाची अन परिश्रमाची किंमत ठेवत आकाशने वर्ग एक-दोन पदावर स्थायिक व्हायचे असा निश्चय करत या परीक्षेची तयारी केली.
परिवहन महामंडळात अधिकारी वर्ग २ या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आल्यानंतर त्याने लागलीच अर्ज दाखल करून तयारी सुरू केली. राज्यातून २५ जागा भरल्या जाणार होत्या तर भटक्या जमाती प्रवर्गासाठी एकही जागा नव्हती मात्र त्याने खुल्या प्रवर्गातून ही परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि तयारी सुरू केली. येथील स्टडी सर्कल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात जाऊन त्याने परीक्षेचा अभ्यास हाती घेतला. या पदांसाठी हजारो अर्ज आले होते. त्यातून तांत्रिक गटासाठी बौद्धिक चाचणी तसेच संबंधित विषयावरील प्रश्नांसाठी ४० गुणांची परीक्षा अशी २०० गुणांची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गुणवत्ता यादीत आकाशचा दुसरा क्रमांक आला आहे. प्रयत्न करत हे मे यश मिळाल्याने आयुष्यात खुप काही कमावल्याचा आनंद नागरे कुटुंबीयांना आहे. आता (ता.१०) नोव्हेंबर पासून त्याचे पुणे (भोसरी) येथे तीन महिन्याचे प्रशिक्षण होणार असून त्यानंतर तो महामंडळाच्या सेवेत दाखल होणार आहे.

आपल्याला काहीतरी करायचे आहे हा ध्यास सदैव मनात

“खेळकर आणि खोडकर वयातही आपल्याला काहीतरी करायचे आहे,असे नेहमीच वाटायचे स्पर्धा परीक्षा देऊन वर्ग एक किंवा दोनच्या पदावर काम करावे अशी आजही इच्छा आहे. मात्र महामंडळात वर्ग दोनच्या पदाची जाहिरात पाहून येथून प्रवासाला सुरुवात करायची या निश्चयाने मी अर्ज दाखल केला आणि परीक्षेची तयारी सुरू केली.वर्षभर केलेल्या माझ्या परिश्रमाला यश आल्याने गगनात न मावणारा आनंद झाला आहे. आता स्पर्धा परीक्षेतून वर्ग-१ च्या पदासाठी झेप घेण्याचा मनोदय आहे.”-आकाश नागरे,येवला


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com