खडसेंची भविष्यवाणी अन्‌ अजित पवारांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

जळगाव : भाजपतील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंनी सोमवारी जळगावातील स्थानिक कार्यक्रमात प्रसारमाध्यमांबाबत बोलताना "उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अजित पवार राजीनामा देतील.. सूत्रांकडून कळते..' असे केलेले वक्तव्य आज तंतोतंत खरे ठरले. खडसेंचे हेच वक्तव्य भविष्यवाणी होती की, राजकीय अंदाज याबद्दल जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीनंतर गेल्या महिनाभर राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सुटत नसताना राज्याच्या राजकारणातून काहीसे बाजूला झालेल्या ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंनी सोमवारी शहरातील एका सायंदैनिकाच्या वर्धापनदिन सोहळ्यात हजेरी लावत प्रसारमाध्यमे व सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेला जनादेश दिलेला असताना केवळ मुख्यमंत्रिपदाच्या कारणावरून युतीत दरी निर्माण होऊन राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना हे तीन पक्ष एकत्र येण्याची स्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले. शिवाय, सिंचन गैरव्यवहारातील 9 प्रकरणांच्या फाइल बंद करण्याचा निर्णयही सोमवारीच आल्यामुळे त्यावर "योगायोग' यासंबंधी भाष्य करतानाही खडसेंनी अजित पवारांना क्‍लीनचीटचा हा योगायोग आहे, असा उपरोधिक टोलाही लगावला होता. 

राजीनाम्याची भविष्यवाणी 
प्रसारमाध्यमांच्या "सूत्र' या विषयावरही खडसेंनी टीका केली. ही "सूत्र' येतात कुठून? असा प्रश्‍न उपस्थित करत "उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अजित पवार राजीनामा देतील... सूत्रांची माहिती' असे वक्तव्यही खडसेंनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा व्हिडिओ आज जिल्ह्यात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. राजकीय वर्तुळातही त्यासंबंधी दिवसभर चर्चा होती. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aknat khadse stetment and ajit pawar rejain