अलका कांबळे मृत्यूबाबत संभ्रम कायम

अलका कांबळे
अलका कांबळे

जळगाव - समतानगरातील धामणगाव वाड्यातील अलका रवींद्र कांबळे या २५ वर्षीय महिलेचा घरात संशयास्पदरीत्या मृतदेह काल आढळून आला होता. रामानंदनगर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती रवींद्र कांबळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेचा व्हिसेरा प्रिझर्व्ह ठेवण्यात आला असून, संशयिताला अटक करण्यात आली. या प्रकरणी मात्र, माहेरच्या मंडळींनी खुनाचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे.

परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्‍यातील चाटोरी या छोट्याशा गावातील मूळ रहिवासी शंकर कांबळे कुटुंबीयांसह काही महिन्यापूर्वीच जळगावी स्थायिक झाले. त्यांचा मुलगा रवींद्र, सून अलका दोन अपत्य यश आणि श्रेया अशांसह एकत्र कुटुंबात धामणगाव वाड्यातील भाड्याच्या घरात राहतो, तर अलकाचे माहेर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर गावातील आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आज सकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले, यावेळी माहिती देताना मामा भगवान इंगळे यांनी सांगितले, की अनेक दिवसांपासून रवींद्र अलकाला त्रास देत होता, अनेकवेळा ती माहेरी निघूनही आली होती. मात्र, दोन अपत्ये असल्याने समजूत घालून तिला पाठवण्यात आल्याचे सांगितले.

दारूच्या नशेत मारले
अलकाच्या मानेवर, मारल्याच्या खुणा आम्ही पाहिल्या. काल मात्र आम्हाला कळवताना अलका व तिच्या पतीने दोघांनी गळफास घेतल्याचे शंकर कांबळे यांच्याकडून सांगण्यात आले, रवींद्र हा दारूच्या आहारी गेला असून त्यानेच तिचा खून केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. आमचं या गावात कोणी नाही...आता पोलिसच मायबाप आणि डॉक्‍टरच आम्हाला न्याय देतील, अशी अपेक्षा असल्याचे भगवान इंगळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

शवविच्छेदनानंतर अहवाल अस्पष्ट 
मृत अलका कांबळे या विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राप्त प्राथमिक अहवालात मृत्यू गळा आवळल्याची शक्‍यता वर्तविण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. चर्चेअंती याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे (कलम-३०६) आणि हुंडाबळी (कलम-४९८)अन्वये गुन्हा दाखल होऊन संशयित रवींद्र कांबळेला अटक करण्यात आली आहे. मृतदेहाचा व्हिसेरा प्रिझर्व्ह ठेवण्यात आला असून, अधिक स्पष्ट अहवाल मिळाल्यानंतर गुन्ह्यात वाढ करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com