देशातील सर्व शहरे 2017 पर्यंत हागणदारीमुक्त - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

फैजपूर (जि. जळगाव) - स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 70 वर्षे होत आली तरी देशातील एकही गाव हागणदारीमुक्त झाले नव्हते, केंद्रात भाजपचे सरकार येताच देशातील 300 पैकी 100 शहरे हागणदारी मुक्त झाली आहे आणि 2017 मध्ये सर्व शहरे हागणदारीमुक्त होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फैजपूर येथे पालिका निवडणूक प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की ग्रामीण भागातील जनतेला हक्काची घरे मिळावी म्हणून 2019 पर्यंत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दोन लाख घरांची कामे पूर्ण केली जाणार आहेत. चौदाव्या वित्त आयोगातून शहर स्वच्छतेसाठी पालिकांना निधी दिला जाईल, त्यासाठी जळगाव जिल्ह्यासाठी 600 कोटी रुपयांचा भरघोस निधी दिलेला आहे.

पन्नास वर्षं कोणी खेटणार नाही...
चांगले प्रकल्प तयार केले तर शासन त्या पालिकांना पाठिंबा देईल. विकासकामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता व गतिमानता आणणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पालिकांमध्ये आता ई-प्रशासन राबवले जाणार आहे व चांगल्या कामांसाठी सॅटेलाइट टॅपिंगच वापर केला जाणार आहे. पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटांमुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. नव्या चलनी नोटांमुळे अर्थव्यवस्था बळकट होईल. तुम्ही पन्नास दिवस त्रास सहन करा, पुढील पन्नास वर्षं कोणीही तुम्हाला खेटणार नाही, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Web Title: All the cities haganadari free in 2017