रुग्णवाहिका ‘१०८’ चा ४१ हजार रुग्णांना लाभ

नरेश हाळणोर
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

नाशिक - आरोग्याची समस्या केव्हा, कुठे अन्‌ कधी उद्‌भवेल हे सांगता येत नाही. संकटकाळी नेहमी मदतीला धावून येणाऱ्यांची वानवा असते, पण हृदयविकाराने पीडित रुग्ण असो की प्रसूतीच्या कळा सोसणारी महिला... भीषण अपघातातील जखमी असो वा दुर्गम भागात रुग्णाला तातडीची आरोग्यसेवा असो... फक्त एकच दूरध्वनी १०८ या क्रमांकावर केला तर अवघ्या काही मिनिटांत सुसज्ज अशी रुग्णवाहिका दारात येते अन्‌ रुग्णाला लगेच नजीकच्या सरकारी वा जिल्हा सरकारी रुग्णालयात पोहोच करते.

नाशिक - आरोग्याची समस्या केव्हा, कुठे अन्‌ कधी उद्‌भवेल हे सांगता येत नाही. संकटकाळी नेहमी मदतीला धावून येणाऱ्यांची वानवा असते, पण हृदयविकाराने पीडित रुग्ण असो की प्रसूतीच्या कळा सोसणारी महिला... भीषण अपघातातील जखमी असो वा दुर्गम भागात रुग्णाला तातडीची आरोग्यसेवा असो... फक्त एकच दूरध्वनी १०८ या क्रमांकावर केला तर अवघ्या काही मिनिटांत सुसज्ज अशी रुग्णवाहिका दारात येते अन्‌ रुग्णाला लगेच नजीकच्या सरकारी वा जिल्हा सरकारी रुग्णालयात पोहोच करते. अगदी मोफत असलेल्या या ४१ रुग्णवाहिका नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार रुग्णांसाठी लाइफलाइन ठरली आहे, तर राज्यात पुणे जिल्ह्यात तीन लाख ३१ हजार, मुंबईत एक लाख ९२ हजार रुग्णांसाठीही १०८ रुग्णवाहिका जीवनदायीच ठरली. 

आरोग्य विभागाच्या माध्यमातून भारत विकास ग्रुपने (बीव्हीजी) रुग्णांना प्राथमिक उपचारासह रुग्णसेवा आणि मोफत सरकारी रुग्णालयापर्यंतची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. १२ प्रकाराच्या रुग्णांसाठी ही रुग्णवाहिका मोफत उपलब्ध आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात ४१ रुग्णवाहिका दररोज अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना रुग्णालयांत पोच करण्यासाठी धावतात. एक रुग्णवाहिका दिवसाला किमान ३ ते ४ रुग्णांना नजीकच्या सरकारी वा जिल्हा सरकारी रुग्णालयात पोचवते. या रुग्णवाहिकेत चालकासह एक वैद्यकीय अधिकारी कार्यरत असतो, तर कार्डियाक रुग्णवाहिकेत प्राथमिक उपचाराच्या सुविधांसह मिनी हॉस्पिटल दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. 

या १०८ रुग्णवाहिकेमुळे अनेक गंभीर रुग्णांना वेळेवर प्राथमिक उपचार व त्यानंतर वेळेत रुग्णालयात पोच केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. या रुग्णवाहिकांचा सर्वाधिक लाभ दुर्गम-अतिदुर्गम भागातील ५० हजार गर्भवती महिलांना झाला. मात्र, अद्याप ग्रामीण भागात या रुग्णवाहिकेविषयीची माहिती नाही. 

नाशिक शहर-जिल्ह्यासाठी १०८ रुग्णवाहिकेतून रुग्णांसाठी मोफत सुविधा असून, आजतागायत या सेवेसंदर्भात एकही तक्रार नाही. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील अत्यवस्थ रुग्णापर्यंत १०८ रुग्णवाहिका पोचली आहे. रुग्णाला वेळेत वैद्यकीय सेवा मिळावी, हाच यामागील उद्देश आहे. 
- अश्‍विन राघमवार, जिल्हा व्यवस्थापक, १०८ रुग्णवाहिका

Web Title: Ambulance 108 Number Patient Profit