डॉ. भामरेंनी जागविल्या ‘बिग बी’जवळ ‘कुली’च्या आठवणी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

दिल्ली विमानतळावर ३४ वर्षांनी अमिताभ बच्चन, संरक्षण राज्यमंत्र्यांची संस्मरणीय भेट

धुळे - महानायक तथा ‘बिग बी’ अमिताभ बच्चन आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची ३४ वर्षांनंतर दिल्ली विमानतळावर शुक्रवारी (ता. २) अनपेक्षित भेट झाली. ती उभयतांसाठी संस्मरणीयच ठरली. यावेळी कुली चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी झालेल्या बच्चन यांना झालेल्या अपघातासंबंधी आठवणी मंत्री भामरे यांनी ‘बिग बी’जवळ जागविल्या. त्यामुळे चर्चेवेळी अमिताभ बच्चनही जुन्या आठवणीत रमले.

संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे दिल्लीहून गेल्या शुक्रवारी (ता. २) मुंबईमार्गे विमानाने धुळ्याकडे येण्यास निघाले. त्यावेळी त्यांची आणि महानायक अमिताभ बच्चन यांची अनपेक्षित भेट झाली. एकमेकांशी ओळख करून घेताना मंत्री भामरे यांनी कुली चित्रपटासंबंधी एक आठवण जागविली. मनमोहन देसाई दिग्दर्शित कुली चित्रपटाचे बंगळूर येथे चित्रीकरण सुरू होते. त्यात अमिताभ बच्चन आणि सहकलाकार पुनीत इस्सार यांच्यात मारामारीचा एक प्रसंग होता. उडी घेताना बच्चन यांना पोटाजवळ टेबलचा कडा लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. हा अपघात २६ जुलै १९८२ ला घडला. तेव्हा बच्चन यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी देशभरातून चाहत्यांनी प्रार्थना केल्या होत्या. 

अपघातानंतर बच्चन यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाली होती. ती मुंबईतील तज्ज्ञ डॉ. शरद शहा यांनी केली होती. त्यावेळी वैद्यकीय पथकात डॉ. भामरे यांचा समावेश होता. ते डॉ. शहा यांचे ‘ज्युनिअर’ होते. अशा घटनेचा मी एक साक्षीदार होतो, अशी आठवण मंत्री डॉ. भामरे यांनी बच्चन यांच्याजवळ सांगितली. तेव्हा बच्चनही प्रभावित झाले आणि त्यावेळचे ज्युनिअर डॉक्‍टर आज देशाचे संरक्षण राज्यमंत्री झाल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला. ३४ वर्षांनंतर ‘कुली’ चित्रपटाविषयीच्या आठवणी जागविल्याने बच्चनही खूश झाले. त्यांनी मंत्री भामरे यांच्याशी केंद्र सरकारचे स्वच्छता अभियान, सीमेविषयीच्या प्रश्‍नांवरही दिलखुलासपणे चर्चा केली.

Web Title: amitabh bachchan & dr. subhash bhamare visit