‘अमृत’च्या कामांबाबत लोकप्रतिनिधी संतप्त

जळगाव - प्रभाग क्र. १ मधील शिवाजीनगरातील लाकूडपेठ ते कानळदा रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचा ढीग पडून आहे. कचरा न उचलल्याने तो रस्त्यावर पसरला आहे. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर संबंधित कचरा उचलला जावा,
जळगाव - प्रभाग क्र. १ मधील शिवाजीनगरातील लाकूडपेठ ते कानळदा रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचा ढीग पडून आहे. कचरा न उचलल्याने तो रस्त्यावर पसरला आहे. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर संबंधित कचरा उचलला जावा,

जळगाव - शहरात सर्वत्र ‘अमृत योजनें’तर्गत जलवाहिनीसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. परंतु पावसाळ्यापूर्वी या खड्ड्यांचे पॅचवर्क काम मक्तेदाराने केले नसल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे व चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण अधिक वाढल्याने शहरात सर्वत्र ओरड होत आहे. ‘अमृत योजने’च्या कामांबाबत लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या बैठकीत मक्तेदारांच्या कामावर तीव्र संताप व्यक्त केला. तसेच खडी व कच टाकून खड्डे बुजविण्याच्या मक्तेदारांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

शहरातील सर्वच रस्त्यांवर सध्या खड्डे व चिखलाचे साम्राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. पावसाळ्यापूर्वी मक्‍तेदारांना खड्डे पॅचवर्कने बुजविण्याच्या सूचना देऊनही त्यांनी ते काम केले नाही. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे. सर्वत्र नागरिकांकडून ओरड होत असल्याने आज महापालिका सभागृहात ‘अमृत’च्या कामांसंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, सभागृह नेते ललित कोल्हे उपस्थित होते. तसेच भाजपचे नगरसेवक व ‘एमआयएम’चे नगरसेवक रियाज बागवान हेही उपस्थित होत. यावेळी सर्व नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागांतील ‘अमृत’च्या कामांमुळे रस्त्यांची लागलेली वाटबाबत तक्रार करून तीव्र संताप व्यक्त केला. 

कच, खडी टाकून खड्डे बुजवा
बैठकीत आमदार भोळेंनी मक्तेदारांच्या कामांवर तीव्र नाराजी व्यक्त करत जलवाहिनीसाठी खोदलेले खड्डे, पॅचवर्कचे काम करण्यासंदर्भात पावसाळा सुरू होण्याआधी दोन महिन्यांपूर्वी तीन-चार वेळा सूचना महापालिकेने दिल्या. परंतु तरीही मक्तेदारांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती आहे. मक्तेदाराने खोदलेले खड्डे कच, खडी टाकून बुजवावेत, असे सांगितले. परंतु मक्तेदारांच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, की करारनाम्यात रस्त्यांचे डांबरीकरण नमूद आहे. पावसाळा असल्याने पॅचवर्कचे काम होणार नाही. खडी, कच टाकण्यासंदर्भात करार नाही. त्यावर सोमवारपर्यंत (८ जुलै) महापालिका खड्डे बुजविण्याचे काम करणार की नाही ते कळवा, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com