आता राज्‍यात आणा सर्वसामान्यांची सत्ता - आनंदराज आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

नाशिक रोड - धर्माच्या नावाखाली नागरिकांना फसविले गेले, त्यांना अशिक्षित ठेवून सत्ता, संपत्तीपासून दूर ठेवले गेले. राज्यातील बहुजन समाज, आंबेडकरवादी, अल्पसंख्याक, बहुजन समाजाने जागृत राहून येणाऱ्या निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाक्रांती घडून सर्वसामान्यांची सत्ता आणा, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी गुरुवारी (ता. १८) केले. 

त्रिशरण लेणीत धम्म प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा, भारिप-बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेनेतर्फे झालेल्या धम्मसभेत ते बोलत होते. रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बागूल अध्यक्षस्थानी होते. भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय दोंदे, राजाभाऊ दोंदे, विलास गांगुर्डे, रविकांत भालेराव, इंद्रजित भालेराव, विजय भालेराव, उन्मेष थोरात, रामा निकम, बापू लोखंडे, संजय सांबळे, पी. के. गांगुर्डे, भिकचंद चंद्रमोरे, भिवानंद काळे, दीपचंद दोंदे, संजय जाधव, जितेंद्र जाधव, अंबादास सोनवणे प्रमुख पाहुणे होते. 

आनंदराज आंबेडकर म्हणाले, की केंद्र व राज्यातील सरकार दलित, गोरगरिबांवर अन्याय, अत्याचार करीत आहेत. राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, राजा सम्राट अशोकाने बौद्ध धम्म प्रचारासाठी देशात अनेक बौद्ध लेणी निर्माण केल्या. त्यांपैकी नाशिकमधील त्रिशरण लेणी आहे. मनुवाद्यांनी हा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला. हे सरकार लेण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. अनेक हिंदूंच्या देवदेवतांच्या स्थानावर अतिक्रमण केले आहे. मनुवादी विचारांनी शिवाजी महाराजांनाही त्रास दिला आहे. संभाजी महाराज, संत तुकाराम महाराजांबद्दल चुकीचे लिखाण करून दिशाभूल केली जात आहे. येणाऱ्या निवडणुकीत मनुवादी विचारसरणीला बाजूला करा, अन्यथा बहुजनांना पुन्हा गुलामगिरीत जीवन जगावे लागेल. जातीवादी सरकार सत्तेपासून दूर करा. 

प्रवीण बागूल यांनी स्वागत केले. संजय दोंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभाकर कांबळे, संतोष सोनवणे, मनोज गाडे, प्रल्हाद उघाडे, शरद भोगे यांनी संयोजन केले.

Web Title: Anandraj Ambedkar Talking