चेष्टामस्करीत राग अनावर झाला अन् मित्राचाच खून केला

प्रमोद सावंत
सोमवार, 15 जुलै 2019

मालेगाव : घरी दारू पित बसलेल्या दोघा मित्रांमध्ये चेष्टामस्करी सुरु होती. चेष्टेचे रुपांतर मारामारीत झाले अन् मित्रानेच केला मित्राचा खून. मालेगाव शहरातील डीके गार्डन भागातील एकतानगरात  रविवारी सायंकाळी प्रकार घडला.

मिथून कल्लू यादव आणि रामसिंग तिलकराम गौतम असे त्या दोन्ही मित्रांचे नाव आहे. मिथून कल्लू यादव हा टाईल्स फिटींग कामगार आहे. मिथुनने मित्र  रामसिंगच्या छातीत चाकू भोसकून खून हा खून  केला.

सुटी असल्याने  दोघे  घरी दारू पित बसले होते. चेष्टा सुरू असतांना वाद व मारामारी झाली. त्यातूनच मिथूनने किचनमधील चाकू रामसिंगच्या छातीत भोसकून खून केला. दोघे उत्तरप्रदेशातील आहेत. नथूराम भारती यांच्या तक्रारीवरून मिथून विरूध्द कँम्प पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The anger became unpleasant and the murderous friend's blood