अनिल पाटलांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

अमळनेर - जिल्हा बॅंकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांनी भाजपला ‘रामराम’ ठोकत राष्ट्रवादी काँगेसमध्ये आज अधिकृत प्रवेश केला. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, गफ्फार मलिक, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, तिलोत्तमा पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या मीना पाटील, योजना पाटील आदी उपस्थित होत्या. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनिल पाटील यांच्यासह सुमारे दीडशे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभरातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्‍त करून मार्गदर्शन केले. यावेळी अनिल पाटील यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती भोजमल पाटील, बाजार समितीचे संचालक उमाकांत पाटील, विजय पाटील, पाडळसरेचे सरपंच रमेश पाटील, माजी उपसरपंच रवींद्र पाटील, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रामकृष्ण पाटील, एल. टी. पाटील, पंचायत समितीच्या सदस्य जयश्री पाटील, जे. के. पाटील, लोणचे सरपंच रामराव पाटील, तासखेडा सरपंच तापीराम पाटील, सुभाष देसले, भाजपचे उपशहरप्रमुख संजय पाटील, विष्णू पाटील, नरेंद्र पाटील, भरत पाटील, प्रवीण पाटील, अनिल पाटील, भगतसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक चौधरी, रमेश चव्हाण, निवृत्ती बागूल, विनोद पाटील, गजानन पाटील, शिवदास पाटील, डॉ. पुरुषोत्तम पाटील आदींसह सुमारे दीडशे कार्यकर्त्यांनीही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

शेकडो कार्यकर्त्यासह प्रवेश सोहळा झाला. विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पाटील, तालुकाध्यक्ष विक्रांत पाटील, युवकचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, भूषण पाटील, डांगरीचे सरपंच  अनिल शिसोदे, जितेंद्र राजपूत आदी उपस्थित होते.  

सत्ताधारी पक्ष असतानाही अनिल पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाने जळगाव जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढणार आहे. आगामी निवडणुकीत याचा निश्‍चितच लाभ होईल.
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री.

कठीण प्रसंगात कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी मला साथ दिली. पंचवीस वर्षातील घुसमट राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाने दूर झाली आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जोरावर आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद सिद्ध करून दाखवू. 
- अनिल पाटील, जिल्हा बॅंक संचालक.

Web Title: anil patil entry in ncp party