'सकाळ'च्या वृत्तानंतर अनिलवर शुभेच्छांचा वर्षाव! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

'सकाळ'ने माझ्या मेहनतीची दखल घेतली. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. 'सकाळ' सारखे आतापर्यंत कुणीही माझ्या पाठीशी उभे राहिले नाही. अनेकांनी कौतुकाचे व शुभेच्छांचे फोन केलेत. काहींनी मदत करण्याचे दर्शविले आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो. 
- अनिल संजय पाटील, धावपटू, पिंपळवाड म्हाळसा. 

पिलखोड (ता. चाळीसगाव) : अवघ्या तासाभरात नॉनस्टॉप पंचवीस किलोमीटर धावणाऱ्या पिंपळवाड म्हाळसा (ता. चाळीसगाव) येथील अनिल पाटीलच्या मेहनतीचे वृत्त आजच्या 'सकाळ'ने प्रसिद्ध करताच, अनेकांनी अनिलचे कौतुक केले. शिवाय त्याला मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही आश्‍वासन दिले. 

ऑलिंपिकमध्ये भारताकडून खेळावे असे स्वप्न पाहणाऱ्या अनिल पाटीलचे 'सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले हेते. त्यात अनिल सकाळ संध्याकाळ घेत असलेली मेहनत यावर प्रकाश टाकण्यात आला होता. भूतान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत त्याला भाग घ्यायचा आहे. त्यासाठी त्याला आर्थिक पाठबळ आवश्‍यक आहे. त्याने भूतानला जाण्यासाठी पासपोर्टही काढून ठेवला आहे. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणासाठी त्याला तेरा हजार रुपयांचे चलन भरावे लागणार आहेत. तर तिथे प्रवासाठी तीस हजारांच्यावर पैशांची आवश्‍यकता आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अनिलला ते शक्‍य नाही. आपल्या मुलाची मेहनत पाहून अनिलच्या आईने मुलासाठी स्वतःचे सोने देखील मोडले आहे. त्याची मेहनत आणि त्याचा हुनर लक्षात घेऊन सकाळने त्याचा सगळा प्रवास मांडला. त्याला आज दिवसभरात तालुक्‍यासह आसपासच्या गावातून अनेक शुभेच्छांचा फोन आला. काहींनी त्याला आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हणाले आहेत. 

चाळीसगावच्या एका बाबांनी फोनवर अनिलशी बोलत त्याला उद्या भेटायला बोलावले आहे. तेही काही प्रमाणात मदत करू शकतील असे त्यांच्या बोलण्यावरून जाणवल्याचे अनिल म्हणाला. 

'सकाळ'ने माझ्या मेहनतीची दखल घेतली. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. 'सकाळ' सारखे आतापर्यंत कुणीही माझ्या पाठीशी उभे राहिले नाही. अनेकांनी कौतुकाचे व शुभेच्छांचे फोन केलेत. काहींनी मदत करण्याचे दर्शविले आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो. 
- अनिल संजय पाटील, धावपटू, पिंपळवाड म्हाळसा. 
 

Web Title: anil patil receives compliments after Sakal news