चाळीसगाव : भोरसमध्ये पुन्हा गुरांना लाळ खुरकतची लागण 

दीपक कच्छवा
गुरुवार, 29 मार्च 2018

भोरस गावात 'लाळ खुरकत' ची लागण होऊन सहा गायींचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर पशुवैद्यकीय विभागाने ही साथ आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण सुरू केले आहे. मात्र तरीही काही गुरांना या आजाराची लागण झाल्याचे दिसून येत आहे. भोरस येथील संभाजी पाटील यांची पाच गुरे व दुसर्‍या एका शेतकऱ्यांची एक गाय यापुर्वी दगावली होती. आजुबाजुला गावतील गुरांनाही या आजाराची लागण होत असल्याचे दिसून येत आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : भोरस( ता.चाळीसगाव) येथे गुरांना 'लाळ खुरकत' आजाराची लागण होऊ नये. यासाठी गुरांचे लसीकरण सुरू असतांनाच काही गुरांना या रोगाची लागण होत असल्याचे दिसत आहे. आशातच जवळच्या करगाव गावात बैल मृत्युमुखी पडल्याने पशुपालकामध्ये भीती निर्माण झाली आहे.

भोरस गावात 'लाळ खुरकत' ची लागण होऊन सहा गायींचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर पशुवैद्यकीय विभागाने ही साथ आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण सुरू केले आहे. मात्र तरीही काही गुरांना या आजाराची लागण झाल्याचे दिसून येत आहे. भोरस येथील संभाजी पाटील यांची पाच गुरे व दुसर्‍या एका शेतकऱ्यांची एक गाय यापुर्वी दगावली होती. आजुबाजुला गावतील गुरांनाही या आजाराची लागण होत असल्याचे दिसून येत आहे.

करगाव (ता.चाळीसगाव) येथील शेतकरी प्रदिप केशव देवरे यांच्या मालकीचे दोन गुरे गेल्या चार दिवसापुर्वी दगावली.27 मार्चला  बैलाचा मृत्यू झाला . त्यामुळे करगाव भागात या रोगाची लागण झाल्याचे दिसून येत आहे.भोरस प्रमाणे करगावात ही गुरांचे लसीकरण करावे आशी मागणी होत आहे.दरम्यान  भोरस येथील परमेश्वर पाटील, नेताजी पाटील, सुहास पाटील, भुषण पाटील,या शेतकर्यांची  काही गुरे गंभीर असून काहींना लागण झाली आहे. त्यामुळे ही साथ परीसरात पसरत असल्याने पशुपालकामध्ये भीती पसरली आहे.

Web Title: animal disease in chalisgaon