जनावरांचे आरोग्य वाऱ्यावर, चारा पिके उरावर!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

जळगाव -  जळगावसह निम्म्या राज्यात दुष्काळ आहे. दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी राज्यात तयारी सुरू आहे. पाण्याच्या टंचाईसह चाऱ्याची प्रचंड टंचाई भासणार आहे. त्या दृष्टीने  पाणी, चाराटंचाईचे नियोजन होणे गरजेचे आहे. अशा स्थितीत चारा उत्पादनाची जबाबदारी चक्क शासनाने कृषी विभागाऐवजी पशुसंवर्धन विभागाकडे दिली आहे. यामुळे आता पशुसंवर्धन अधिकारी चाऱ्याचे उत्पादन मोजताना दिसले तर आश्‍चर्य वाटण्याची गरज नाही. जनावरांच्या डॉक्‍टरांचे काम जनावरांचे आरोग्य तपासून प्रतिबंधात्मक लसीकरण, औषधोपचार करणे असताना त्यांना त्या कामाऐवजी चक्क चारा उत्पादन घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शासनाने पशुसंवर्धन विभागाला राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत राज्यातील संभाव्य चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी वैरण, बियाणे व खते बियाणे व गाळपेर या योजना राबविण्याचे आदेश दिले आहेत.

या सर्व कामांसाठी क्षेत्रभेट घेऊन प्रत्यक्ष जागेवर करणे आवश्‍यक आहे. यासाठी तांत्रिक सुविधा (संगणक, नेट कनेक्‍शन, ऑपरेटर) संस्थापातळीवर उपलब्ध असणे गरजेचे आहे. मुळात या विभागाकडे हे साहित्य उपलब्ध नाही. सोबतच कमी मनुष्यबळावर पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाच्या विविध योजना राबविताना या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी, पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. आता नव्याने त्यांच्यावरच चारा लागवडीचे काम सोपविण्यात आले आहे. वास्तविकत, चारा बियाण्याची गुणवत्ता तपासणे, चारा वाढीबाबत अभ्यासपूर्ण माहिती घेण्याचे काम हे पशुसंवर्धन विभागापेक्षा कृषी विभागाला योग्य प्रकारे लक्षात येण्यासारखे आहे. मात्र ते काम पशुसंवर्धन विभागावर लादले गेले आहे. 

डिसेंबर महिना मध्यावर आला तरी जागा निश्‍चित झालेल्या नाहीत. दुष्काळीभागात सध्या चाराटंचाई जाणवू लागली आहे. जानेवारीपासून चाराटंचाई अधिकच जाणवू लागेल. राज्य शासन व जिल्हा प्रशासन याबाबींचा विचार करून चारा उत्पादन घेण्याची कामे राज्य शासनानेच पशुसंवर्धन विभागापेक्षा कृषी विभागाकडे दिली तर कामांमध्ये गती येऊन चारा टंचाईच्या काळात चाऱ्याचे उत्पादन येईल.

‘पशुसंवर्धन’ची कामे...
 जनावरांना वर्षातून दोनदा लसीकरण करणे
 शेळ्या- मेंढ्यांना जरबा, अंत्रविषार लसी देणे
 जनावरांना फिरतीवर नेऊन शस्त्रक्रिया करणे
 कृत्रिम रेतन, गर्भ तपासणी, वंधत्व निवारण, जंत, गोचीड, शवविच्छेदन करणे
 कामधेनू दत्त ग्राम योजना राबविणे.

त्यांना दिली ही कामे..
 चारा लागवडीसाठी लाभार्थीची निवड करणे
 चारा लागवडीसाठी जमीन व सिंचन व्यवस्था करणे
 बियाणे, पेरणीची, उगवणीची, कापणीची छायाचित्रे ऑनलाइन अपलोड करणे
 या सर्व कामांसाठी अधिकाऱ्यांना क्षेत्रभेट देण्याशिवाय पर्याय नाही.

Web Title: Animal health fodder crops issue due to drought