रुग्णवाहिकेतून गुरांची अवैध वाहतूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

जळगाव - कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या गुरांची चक्क रुग्णवाहिकेतून अवैध वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार महामार्गावरील आर. एल. चौफुलीजवळ आज उघडकीस आला. संतप्त जमावाने या रुग्णावाहिकेची तोडफोड केली असून, चालक मात्र फरार झाला आहे. एमआयडीसी पोलिसांनी रुग्णवाहिकेला ताब्यात घेऊन यातील 6 गुरांची सुटका केली आहे. 

संबंधित रुग्णवाहिका पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या वाहनाच्या मूळ मालकांचा शोध घेण्यात येणार असून, गुरांना कोठून आणण्यात आले व कोठे नेण्यात येत होत याचा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: animal illegal transsport in ambulance