Success Story : दृढ निश्चय, आत्मविश्वासाच्या जोरावर अंजली बनली पोलिस शिपाई | Anjali Gavit selected for post of Police Constable in Pune Police Rural Division nandurbar news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anjali Gavit

Success Story : दृढ निश्चय, आत्मविश्वासाच्या जोरावर अंजली बनली पोलिस शिपाई

Nandurbar News : मोड (ता. तळोदा) येथील अंजली कृष्णा गावित (वय २३) या तरुणीची पुणे पोलिस ग्रामीण विभागात पोलिस शिपाई या पदासाठी नुकतीच निवड झाली. तिला पुणे पोलिस मुख्यालयातील अंकुश गोयल यांनी नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले आहे. (Anjali Gavit selected for post of Police Constable in Pune Police Rural Division nandurbar news)

ही तिची निवड मोड गाव व परिसरातील आदिवासी तरुणींसाठी प्रेरणादायी आहे. अंजली गावित हिला पोलिस दलाचे आकर्षण असल्याने प्रथमपासूनच पोलिस व्हायचे ठरवले होते. त्यानुसार तिची वाटचाल सुरू होती. तिचे माध्यमिक शिक्षण गावातील कॉम्रेड बी. टी.आर. हायस्कूलमध्ये झाले. उच्च माध्यमिक शिक्षण तळोदा येथील कनिष्ठ महाविद्यालयात पूर्ण केले.

या दरम्यान तिच्या वडिलांची सोबत ही सुटली. पण तरी तिची आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून तिची वाटचाल सुरू होती. त्यासाठी तिला आई सुपडीबाई गावित, आजोबा बालम गावित, रमण वळवी यांनी वेळोवेळी हिंमत व प्रोत्साहन दिले. पोलिस भरतीसाठी आवश्यक प्रशिक्षण संगमनेर येथील स्पेलिंग पोलिस ॲकॅडमी ज्ञानराज येथे घेतले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तेथील भास्कर शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर पुणे जिल्हा पोलिसमध्ये ग्रामीण भागासाठी पोलिस शिपाई पदासाठी लेखी व मैदानी परीक्षेत यशस्वी झाली. दृढ निश्चय, आत्मविश्वास व परिश्रमाच्या जोरावर कुणास आपले ध्येय साधता येत असल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या.

तिच्या निवडीबद्दल अंबर मंडळाचे अध्यक्ष मंगलसिंग चव्हाण, सचिव जयसिंग माळी, शाळेचे मुख्याध्यापक आय. जी. पिंजारी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. नियुक्तीबद्दल मोड गावातून तिचे कौतुक होत आहे.

टॅग्स :Nandurbarpolice constable