अण्णा समर्थकांनी अडविला नगर-पुणे रस्ता 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

मध्यरात्री अधिकाऱ्यांचे झोपमोड आंदोलन; भाळवणीत कडकडीत बंद

नगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील सत्याग्रहाच्या समर्थनार्थ आज सकाळी अण्णा हजारे समर्थक कार्यकर्त्यांनी बसस्थानक चौकात निदर्शने केली. त्यानंतर नगर-पुणे रस्त्यावर रास्ता-रोको आंदोलन केले. दरम्यान, मध्यरात्री काही कार्यकत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अधिकाऱ्यांचे झोपमोड आंदोलन केले. 

अण्णा हजारे यांना समर्थन देण्यासाठी आज भाळवणी (ता. पारनेर) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. काल (ता.28) समर्थकांनी भर उन्हात कार्यकत्याद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून आत्मक्‍लेश सत्याग्रह केला होता. त्यातील काही कार्यकर्त्यांनी आज सकाळी अचानक नगर-पुणे रस्त्यावर रास्ता-रोको आंदोलन केल्याने पोलिसांची पळापळ झाली. 

केंद्र सरकारला सत्याग्रहाची पूर्वकल्पना होती. मात्र, त्यांनी मागण्यांबाबत जाणीवपूर्वक चालढकल करत असल्याचा आरोप सहभागी आंदोलकांनी केला. 

Web Title: Anna supporters blocked Advila Nagar-Pune road