शिक्षकेतर कर्मचार्यांचा आकृतीबंध जाहीर करत ‘गाजर’!

शिक्षकेतर कर्मचार्यांचा आकृतीबंध जाहीर करत ‘गाजर’!

येवला - २००५ नंतर राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी भरती करण्यासाठी शासनाने सुधारित आकृतीबंध जाहीर केला आहे. मात्र विविध पदांसाठी विद्यार्थी संख्येचा स्पीडब्रेकर वाढवला आहे. नव्या आकृतीबंधामुळे २०१३ नंतर शाळांतील लिपिक, अधीक्षक, ग्रथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक ही पदे भरण्याचा आशावाद वाढला आहे. मात्र पद भरतीबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याने हे निवडणुकीच्या तोंडावरील गाजर ठरणार नाही ना अशी शक्यता व्यक्त होत आहे.

शिक्षण विभागाने निर्णय घेताना सर्व खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध निश्चि्त करण्यासंदर्भातील यापूर्वीचे सर्व शासन अधिक्रमित करण्यात आले आहे. तर चतुर्थ श्रेणीचा आकृतिबंध मात्र राखीव ठेवला आहे. राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये २०१३ नंतर शिक्षकेतर पदांची भरती झालेली नसून ही बंदी उठविण्याच्या मागणीला या सुधारित आकृतीबंधाने थोडा का महिना आधार मिळाला आहे. यापुढील काळात शाळांच्या संचमान्यता व आरक्षणाचा तक्ता निश्चित होहून रिक्तपदांची भरती होण्याची शक्यता आहे. मात्र आकृतीबंद लागू करण्याच्या शासन निर्णयात तसा उल्लेख नसल्याने अजून तरी असे म्हणणे धाडसाचे होईल.

असे आहे नवे स्वरूप...
निकष वाढवत इतर मागण्या असूनही फारसा बदल न केल्याने या आकृतिबंधाला संघटनाकडून विरोध होत आहे.आता पाचवी ते बारावीपर्यंत ५०० पटसंख्या असलेल्या शाळांना एक लिपिक मिळणार आहे.तर १००० पर्यतच्या विद्यार्थी संख्येला एक कनिष्ठ व एक वरिष्ठ आणि एक हजार ते २२०० पर्यंत दोन कनिष्ठ व एक वरिष्ठ लिपिक मिळणार आहे. याव्यतिरिक्त १६०० ते २८०० संख्येला एक मुख्य लिपिक मिळणार असून यापेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास प्रत्येक ६०० विद्यार्थीमागे एक कनिष्ठ लिपिक शाळांना मिळू शकणार आहे. तसेच एक हजार पटसंख्या असलेल्या शाळांना एक पूर्णवेळ ग्रंथपाल मिळणार आहे.नववी ते दहावीपर्यंत ७०० पटसंख्या असलेल्या शाळांना एक प्रयोगशाळा सहायक, व त्यावर अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना दोन प्रयोगशाळा सहायक मिळणार आहेत. तर उच्च माध्यमिकसाठी जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयासाठी एक असे प्रयोगशाळा सहायक मिळणार आहेत.

आता होतील तीस हजार पदे
नव्या आकृतिबंधनुसार राज्यातील शाळांमध्ये कनिष्ठ लिपिकांची १७ हजार ६९५ पदे, वरिष्ठ लिपिकांची ४ हजार ९१२  पदे, मुख्य लिपिकांची ९२३ पदे असतील. तर ग्रंथपालांची २ हजार ११८ पदे तर प्रयोगशाळा सहायक नववी ते दहावीची ४ हजार ६८५ पदे निर्माण होणार आहेत. सोबतच प्रयोगशाळा सहायक उच्च माध्यमिक २ हजार ४० पदेही यातून निर्माण केली जाणार आहेत.या निर्णयाने जेथे पदे रिक्त आहेत येथे भरतीसाठी संधी आली आहे.

“सुधारित आकृतीबंध जाहीर केल्याने पदे भरण्याची शक्यता वाढली असून यामुळे प्रतीक्षेतील बेरोजगारांकडून याचे स्वागत केले आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी वाढवलेली विद्यार्थी संख्या व निकष शिक्षक संघटनांना मान्य नसून याबाबत शासनाकडे मागण्या करणार आहेत.स्वरूप बदलून निवडणुकीपूर्वी सर्व जागा भराव्यात.”
- सचिन मुंढे, तालुका अध्यक्ष, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com