काव्यगायन स्पर्धेत अनुराग जगदाळे प्रथम!

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील जवाहरलाल सार्वजनिक वाचनालयात वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह यांच्या मातोश्री व माजी सरपंच अजितचंद्र शाह यांच्या धर्मपत्नी स्व.वर्षाबेन अजितचंद्र शाह यांच्या स्मृतिनिमित्त नुकतीच काव्यगायन स्पर्धा झाली. तीत आदर्श विद्या मंदिराचा दहावीचा विद्यार्थी अनुराग भगवान जगदाळे याने प्रथम क्रमांक पटकावला. अनुरागने कवयित्री विजया पाटील रचित "वसा सावित्रीचा हा आम्ही चालवू" हे काव्य सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

सुरुवातीला माजी सरपंच अजितचंद्र शाह, ग्रामपंचायत सदस्य सलीम पठाण, सामाजिक कार्यकर्ते जगदीशचंद्र शाह, रघुवीर खारकर, वाचनालयाचे अध्यक्ष नयनकुमार शाह, सचिव नितीन शाह, खजिनदार शैलेश शाह, संचालक संजय शाह, भुपेश शाह आदींनी स्व.वर्षाबेन शाह यांच्या प्रतिमेचे पूजन केले. उपाध्यक्ष कमलेश शाह, संचालक मनोहर राणे, शैलेंद्र शाह, कपिल शाह, अमित शाह, नेहा नयनकुमार शाह आदींनी सहकार्य केले.

स्पर्धेत आदर्श विद्या मंदिराचा दहावीचा विद्यार्थी अनुराग भगवान जगदाळे ह्याने प्रथम, राजनंदिनी शानाभाऊ बच्छाव हिने द्वितीय, तर इंदिरा गांधी कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी दीपाली बापू जगताप हिने तृतीय क्रमांक पटकावला. आदर्श विद्या मंदिराचेच विद्यार्थी संध्या किशोर गवळे, यश प्रवीण राणे, कृष्णा मनोज पाटील व आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुलचा विद्यार्थी रितेश जगदीश खैरनार यांनी उत्तेजनार्थ चौथा क्रमांक पटकावला.

स्पर्धेसाठी आधी निवड चाचणी घेण्यात आली. स्पर्धेत परिसरातील आदर्श विद्या मंदिर, इंदिरा गांधी कन्या विद्यालय, आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल आदी शाळांतील सातवी ते दहावीच्या सुमारे 35 शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. स्पर्धकांनी सावित्रीबाई फुले, आई, शेतकरी, संसार आदी विषयांवर वैविध्यपूर्ण स्वरचित, संकलित, संग्रहित काव्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

काव्यगायन स्पर्धेचे परीक्षण शिक्षक पंढरीनाथ बागुल, विवेक बधान, श्रद्धा ठाकरे यांनी केले. तर चंद्रकांत शिंपी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. वाचनालयाचे कर्मचारी प्रतीक शाह, अरुण अहिरे आदींनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. यशस्वी स्पर्धकांना नंतर होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

Web Title: anurag jagdale firist in Poetry competition at nijampur jaitane